प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! EPFO पेन्शन होऊ शकते ₹5,000
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सरकार ईपीएफओ पेन्शन वाढवण्याचा विचार करत आहे आणि जर ते मंजूर झाले तर किमान पेन्शन दरमहा ₹1,000 वरून ₹5,000 पर्यंत वाढेल. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
advertisement
1/8

प्रायव्हेट सेक्टरसाठी पगारदार कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ पेन्शन वाढवण्याचा विचार करत आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक बऱ्याच काळापासून ही वाढ करण्याची मागणी करत आहेत.
advertisement
2/8
सध्या, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांना मिळणारे किमान मासिक पेन्शन फक्त ₹1,000 आहे. वेगाने वाढणारी महागाई असूनही, ही रक्कम अनेक वर्षांपासून वाढलेली नाही.
advertisement
3/8
हे लक्षात घ्यावे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना कर्मचारी पेन्शन योजने (ईपीएस) अंतर्गत पेन्शन लाभ मिळतात. सरकार ईपीएस योजनेअंतर्गत किमान पेन्शन ₹1,000 वरून ₹5,000 पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे.
advertisement
4/8
या पेन्शनचा फायदा EPFOमध्ये रजिस्टर्ड प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना, 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्यांना आणि सध्या किमान पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना होईल. पेन्शन वाढीमुळे अनेक पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे.
advertisement
5/8
खरंतर अद्याप सरकारची मान्यता मिळालेली नाही. हा प्रस्ताव येत्या अर्थसंकल्पात किंवा सामाजिक सुरक्षा सुधारणा बैठकांमध्ये मांडला जाऊ शकतो. सरकार डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पीएफ काढणे, पेन्शन वितरण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा सुलभ करण्याची आणि सुधारण्याचा प्लॅन करत आहे.
advertisement
6/8
EPFO मेंबर्सना सल्ला दिला जातो की, आपला सर्व्हिस रेकॉर्ड अपडेट ठेवा आणि फक्त सरकार किंवा ईपीएफओकडून येणाऱ्या अधिकृत घोषणांवर विश्वास ठेवा.
advertisement
7/8
ईपीएफओ ही एक सरकारी संस्था आहे जी नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या पगारातून कापून घेतलेले पीएफ निधी गोळा करते, मॅनेज करते आणि सुरक्षित करते. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार मिळावा हा त्याचा उद्देश आहे.
advertisement
8/8
ईपीएफओची स्थापना 1952 मध्ये कर्मचारी भविष्य निधी आणि विविध तरतुदी कायद्यांतर्गत करण्यात आली. ईपीएफओ 3 योजना चालवते- कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ), कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) आणि कर्मचारी ठेवीशी जोडलेले विमा (ईडीएलआय).
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! EPFO पेन्शन होऊ शकते ₹5,000