TRENDING:

LICच्या या स्किमध्ये रोज टाका 45 रुपये, लाइफटाइम विम्यासह मिळेल बंपर रिटर्न

Last Updated:
भारतात एलआयसीच्या योजना खुप प्रसिद्ध आहेत. आपल्या सुरक्षित भविष्यासाठी लोकं एलआयसीच्या विविध योजनांचा लाभ घेत असतात. यापैकीच एक न्यू जीवन आनंद योजना आहे. यात गुंतवणूक करून तुम्ही मोठा नफा मिळवू शकता.
advertisement
1/7
LICच्या या स्किमध्ये रोज टाका 45 रुपये, लाइफटाइम विम्यासह मिळेल बंपर रिटर्न
मुंबई : आपलं भविष्य हे सुरक्षित राहावं म्हणून लोक विविध योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. तर काही लोक हे एलआयसीमध्ये इन्शुरन्स प्लॅन्सही खरेदी करतात. हे प्लॅन्स भविष्याला सिक्योर करतात यासोबतच मोठा निधीही निर्माण करतात.
advertisement
2/7
न्यू जीवन आनंद (प्लान 915) हा एक असाच एलआयसी प्लॅन आहे. ज्यात बचत आणि विमा दोन्हीही भारी आहे. ही योजना कमी प्रीमियममध्ये दीर्घ कालावधीसाठी मोठा फंड आणि आयुष्यभराची सुरक्षा हवी असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे.
advertisement
3/7
रोज करा लहान बचत, मॅच्योरिटीवर मिळेल मोठा फायदा : या योजनेत किरकोळ गुंतवणूक केल्याने मोठा फंड तयार केला जाऊ शकतो. उदाहरण पाहिल्यास, 35 वर्षांची व्यक्ती 5 लाख रुपयांच्या सम अश्योर्डसह 35 वर्षांची पॉलिसी घेत असेल. तर त्याला वार्षिक जवळपास 16,300 रुपये प्रीमियम द्यावा लागेल. म्हणजेच दरमहा जवळपास 1,359 रुपये किंवा रोज जवळपास 45 रुपयांची बचत करावी लागेल.
advertisement
4/7
पूर्ण कालावधीमध्ये एकूण गुंतवणूक जवळपास 5.70 लाख रुपये होते. मात्र मॅच्योरिटीवर उपलब्ध बोनसच्या आधारावर जवळपास 25 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. यात सम अश्योर्डसह रिव्हिजनरी आणि फाइल बोनस सामिल असते.
advertisement
5/7
मॅच्योरिटीनंतरही जारी राहील विमा : या पॉलिसीची सर्वात खास गोष्ट म्हणजे, मॅच्योरिटीनंतरही विमा कव्हर संपत नाही. रक्कम मिळाल्यानंतरही 5 लाख रुपयांचा लाइफ कव्हर आयुष्यभर मिळत राहतो. जो कुटुंबाला अतिरिक्त सुरक्षा देतो.
advertisement
6/7
टॅक्स सूट आणि लोन सुविधा : या योजनेत गुंतवणूकीवर आयकर अधिनियमच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळते. तर मॅच्योरिटी आणि मृत्यू लाभ कलम 10(10D) अंतर्गत टॅक्स-फ्री असतात. सोबतच पॉलिसीधारकाला दोन वर्षानंतर गरज पडल्यास लोनही घेता येतं. यासोबतच प्रीमियम भरण्यासाठी 15 ते 30 दिवसांचा ग्रेस पीरियड मिळतो.
advertisement
7/7
कोणत्या लोकांना होईल फायदा : 18 ते 50 वर्षे वय असणारे लोक 15 ते 35 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. गरजेनुसार अॅक्सीडेंटल डेथ किंवा गंभीर आजारांसारखे रायडर्स जोडून सुरक्षा वाढवली जाऊ शकते. कमी गुंतवणुकीत मोठा फंड आणि आयुष्यभराची सुरक्षा हवी असेल तर LIC ची ही योजना एक विश्वासार्ह ऑप्शन ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
LICच्या या स्किमध्ये रोज टाका 45 रुपये, लाइफटाइम विम्यासह मिळेल बंपर रिटर्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल