TRENDING:

Gold Silver Price: दसऱ्याआधीच 1,41000 वर पोहोचले चांदीचे दर, सोन्याचा भाव काय? घरबसल्या चेक करा

Last Updated:
MCX वर चांदी १,३९,३०० पर्यंत पोहोचली तर दिल्ली सराफा बाजारात 1,41,900 प्रति किलोग्रामच्या विक्रमी शिखरावर. सोन्याचे दरही वाढले, सणासुदीमुळे मागणी जोरात.
advertisement
1/6
दसऱ्याआधीच 1,41000 वर पोहोचले चांदीचे दर, सोन्याचा भाव काय? घरबसल्या चेक करा
भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी चांदीने नवा इतिहास रचला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या किमती १,३९,३०० पर्यंत पोहोचल्या, तर दिल्लीतील सराफा बाजारात ती थेट 1,41,900 प्रति किलोग्रामच्या नव्या विक्रमी शिखरावर जाऊन पोहोचली. गुरुवारी 1,40,000 रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली होती.
advertisement
2/6
सणासुदीच्या हंगामातील वाढती मागणी आणि गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी यामुळे चांदीचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय कमजोरीकडे दुर्लक्ष करत, भारतातील सातत्याने वाढणारी मागणी, सणासुदीची खरेदी आणि गुंतवणूकदारांची आवड यामुळे देशांतर्गत बाजारात सोने-चांदीने जोरदार तेजी नोंदवली.
advertisement
3/6
चांदीसोबतच सोन्याच्या दरातही मोठी तेजी दिसून आली. दिल्लीच्या स्थानिक बाजारात 99.9% शुद्धतेचे सोने 330 ने वधारले आणि ते 1,17,700 प्रति 10 ग्रॅम GST सह नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर, 99.5% शुद्धतेचे सोनं 400 रुपयांनी वाढलं असून 1 लाख 17 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलं आहे.
advertisement
4/6
दिल्ली सराफा असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीचा व्यवहार किंचित घसरणीसह सुरू होता. जागतिक स्तरावर स्पॉट गोल्ड ०.१२% घसरून USD ३,७४४.७५ प्रति औंसवर, तर चांदी ०.३५% ने घसरून USD ४५.०३ प्रति औंसवर व्यवहार करत होती.
advertisement
5/6
सणासुदीच्या काळात सोने-चांदीची मागणी दरवर्षी वाढतेच. सध्या लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्याने ज्वेलर्स आणि ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. याशिवाय, सोने-चांदीला सुरक्षित गुंतवणूक (Safe Haven) मानले जाते, ज्यामुळे स्टॉकिस्टही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
advertisement
6/6
तज्ज्ञांच्या मते,, भारतात सोने-चांदीचा वापर जगात सर्वाधिक आहे. यामुळेच अनेकदा आंतरराष्ट्रीय किमतीत घसरण होऊनही देशांतर्गत दर उच्च पातळीवर टिकून राहतात. तज्ज्ञांच्या मते, सध्या देशांतर्गत मागणी टिकून असल्यामुळे सोने-चांदीची चमक आणखी वाढू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silver Price: दसऱ्याआधीच 1,41000 वर पोहोचले चांदीचे दर, सोन्याचा भाव काय? घरबसल्या चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल