Credit Card: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स खिशात आहेत? 'हा' आकडा ठरवेल तुमचा सिबिल स्कोअर वाढणार की कमी होणार!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Credit Card: आजकाल पहिलं खरेदी आणि नंतर पेमेंट असा ट्रेंड सुरू झाला आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय. अनेकदा एका बँकेचं कार्ड असताना आपण दुसऱ्या बँकेच्या ऑफरला भुलून दुसरं, तिसरं कार्डही घेतो. काहीवेळा सिबिल स्कोअर वाढवण्याच्या नादात चार चार क्रेडिट कार्ड खरेदी केले जातात. खिशात कार्ड्सची संख्या वाढली की मनात एकच धडकी भरते. जास्त कार्ड्समुळे माझा सिबिल स्कोअर तर खराब होणार नाही ना? जर तुम्हालाही असंच वाटत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
advertisement
1/5

समजा, तुमच्याकडे ३ क्रेडिट कार्ड्स आहेत आणि प्रत्येकाची मर्यादा २ लाख रुपये आहे. अशा वेळी तुमची एकूण क्रेडिट मर्यादा ६ लाख रुपये होते. आता जर तुम्ही महिन्याला तिन्ही कार्ड्स मिळून फक्त ५० हजार रुपये खर्च करत असाल, तर तुम्ही तुमच्या एकूण मर्यादेच्या केवळ ८ ते १० टक्के हिस्सा वापरत आहात.
advertisement
2/5
बँकिंगच्या भाषेत याला 'क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणतात. तुमचा सिबिल स्कोअर वेगाने वाढवण्यासाठी हा रेशो ३० टक्क्यांच्या आत असणं उत्तम मानलं जातं. जेव्हा तुमच्याकडे जास्त कार्ड्स असतात, तेव्हा तुमची एकूण क्रेडिट लिमिट वाढते. परिणामी, तुमचा खर्च मर्यादेच्या तुलनेत कमी दिसतो.
advertisement
3/5
बँकांना आणि क्रेडिट ब्युरोला असं वाटतं की, या व्यक्तीकडे खर्च करण्यासाठी मोठी रक्कम उपलब्ध असूनही ती व्यक्ती अत्यंत संयमाने आणि शिस्तीने पैसे वापरते. अशा 'क्रेडिट हँडलिंग'मुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होण्याऐवजी उलट सुधारण्यास मदत होते.
advertisement
4/5
जास्त कार्ड्स असणं तोट्याचं तेव्हाच ठरतं, जेव्हा तुम्ही प्रत्येक कार्डची मर्यादा संपवून खर्च करता. अनेक कार्ड्सची बिलं वेळेवर भरायला विसरता.एकापाठोपाठ एक अनेक कार्ड्ससाठी अर्ज करता यामुळे Hard Inquiry वाढते.
advertisement
5/5
जर तुम्ही कार्ड्स फक्त ऑफर्ससाठी घेतली असतील आणि ती कपाटात सुरक्षित ठेवून एखादंच कार्ड मर्यादेत वापरत असाल, तर घाबरण्याचं कारण नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Credit Card: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स खिशात आहेत? 'हा' आकडा ठरवेल तुमचा सिबिल स्कोअर वाढणार की कमी होणार!