लग्नानंतर नोकरी सोडली, पण जिद्द नाही; तिनं घरातूनच सुरू केला बिझनेस, आता बक्कळ कमाई
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Business woman: लग्नानंतर पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून नाशिकला जावं लागलं. घरातून सुरू केलेल्या व्यवसायातून अनेक महिलांना रोजगार दिला.
advertisement
1/5

कधीकाळी महिलांचं विश्व हे फक्त ‘चूल आणि मूल’ पुरतंच मर्यादित होतं. परंतु, आता अनेक महिला नोकरी आणि व्यवसायात आपली वेगळं विश्व निर्माण करत आहेत. नाशिकमध्ये राहणाऱ्या रश्मी निघोसकर यांचा अशाच स्त्रियांमध्ये समावेश होतो.
advertisement
2/5
रश्मी या पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरी करत होत्या. लग्न झाल्यानंतर त्यांना पुणे सोडून नाशिकमध्ये यावं लागलं. नोकरीत रस नसल्याने काय करणार? असा प्रश्न होता. तेव्हा त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
3/5
रश्मी यांनी ज्वेलरी डिझाईन आणि ज्वेलरी मेकिंग शिकण्यास सुरवात केलं. नंतर त्यांनी घरीच ज्वेलरी बनवून विक्री सुरू केली. हळूहळू ज्वेलरीच्या व्यावसायला प्रतिसाद मिळू लागला. तेव्हा रश्मी यांनी इंदिरानगर भागात 'सखी कलेक्शन' या नावाने दुकान सुरू केलं. तसेच त्यांनी इतरांचे क्लास घेण्यास देखील सुरुवात केली.
advertisement
4/5
आतापर्यंत रश्मी यांना अनेक जणांना ज्वेलरी डिझाईन करण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर त्यांनी ब्युटी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कॉस्मेटिकची माहिती घेतली. त्यासाठी विविध क्लासेस केले आणि योग्य मार्गदर्शन घेऊन स्वतःचे हर्बल साबण बनवले.
advertisement
5/5
कोरोना काळापासून या नैसर्गिक साबणांना आणि ब्युटी प्रॉडक्ट्सला चांगलीच मागणी आहे. आता या व्यवसायातून महिन्याला 70 ते 80 हजार रुपयांचं उत्पन मिळवत आहेत. इतकेच नाही तर साबण आणि बाकी वस्तूंची होलसेल दरात विक्री करून त्यांनी इतर महिलांनाही रोजगाराची संधी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
लग्नानंतर नोकरी सोडली, पण जिद्द नाही; तिनं घरातूनच सुरू केला बिझनेस, आता बक्कळ कमाई