TRENDING:

EPFO च्या 31 कोटी सदस्यांसाठी मोठी बातमी! PF व्याजदरांवर झाला निर्णय

Last Updated:
PF Interest Rate: आज पीएफ व्याजदरांवर सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ईपीएफओच्या जवळपास 31 कोटी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एका महत्त्वाच्या बैठकीत व्याजदरावर निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या तुम्हाला किती होईल फायदा...
advertisement
1/6
EPFO च्या 31 कोटी सदस्यांसाठी मोठी बातमी! PF व्याजदरांवर झाला निर्णय
PF Interest Rate: कर्मचारी भविष्य निधीच्या व्याजदरांवर आज मोठा निर्णय झाला आहे. Employee's Provident Fund Organisation च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक झाली, ज्यामध्ये पीएफ व्याजदरांविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
advertisement
2/6
ईपीएफओच्या जवळपास 31 कोटी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भविष्य निधीच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सलग तिसऱ्या वर्षी व्याजदर 8.25 टक्क्यांवर स्थिर राहण्यासी शिफारिश केली आहे.
advertisement
3/6
पीएफबाबतचा सर्वात मोठा निर्णय : या बैठकीच्या अध्यक्षतेखाली कामगार आणि रोजगार मंत्री होते. केंद्रीय विश्वस्त मंडळ ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे, जी निधीचे व्यवस्थापन, गुंतवणूक आणि वितरण यावर देखरेख करते. पीएफशी संबंधित सर्व प्रमुख निर्णय या संस्थेद्वारे घेतले जातात.
advertisement
4/6
सलग 3 वर्षांपासून वाढले नाहीत पीएफज व्याजदर : सलग तिसरं वर्ष आहे, जेव्हा ईपीएफओचे व्याजदर 8.25 टक्क्यांवर आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये EPFOने व्याजदर 8.15 टक्क्यांवरुन वाढवून 8.25 टक्के केले होते. यापूर्वी आर्थिक वर्ष 2022 मध्ये पीएफ व्याजदर कमी होऊन 8.1 टक्क्यांवर आले होते. हा चार दशकांचा सर्वात खालचा स्थर होता.
advertisement
5/6
PF व्याजदर हा सदस्यांच्या बॅलेन्स रकमेवर आधारित मासिक निश्चित केला जातो परंतु आर्थिक वर्षाच्या शेवटी तो दरवर्षी खात्यात जमा केला जातो. हा व्याजदर ईपीएफओ गुंतवणुकीद्वारे मिळणाऱ्या परताव्याच्या आधारे निश्चित केला जातो.
advertisement
6/6
देशभरातील लाखो खातेदारांवर परिणाम : केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा लाखो पीएफ खातेधारकांवर परिणाम होऊ शकतो. कर्मचारी आणि गुंतवणूकदार या बैठकीच्या निकालांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण ही बैठक त्यांच्या रिटायरमेंट फंडवरील रिटर्न निश्चित करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
EPFO च्या 31 कोटी सदस्यांसाठी मोठी बातमी! PF व्याजदरांवर झाला निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल