TRENDING:

Success Story: गृहिणी बनली उद्योजिका, लघु उद्योगानं पालटलं नशीब, प्रत्येकांनी वाचावी अशी कहाणी

Last Updated:
यामध्ये शेवया बनवणे, उडीद, मूग अशा विविध प्रकारच्या डाळींचे पापड बनवण्यासाठी पीठ तयार करून देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून जाधव महिन्याकाठी जवळपास 60 हजार रुपयांची कमाई करतात.
advertisement
1/7
गृहिणी बनली उद्योजिका, लघु उद्योगानं पालटलं नशीब, प्रत्येकांनी वाचावी अशी कहाणी
छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा गावातील गृहिणी राजश्री जाधवने लघु उद्योगाच्या माध्यमातून केवळ स्वतःसाठी नव्हे तर मार्गदर्शक ठरेल असे यश संपादन केले आहे. लघुउद्योगाच्या माध्यमातून त्या वेगवेगळे पदार्थ बनवतात.
advertisement
2/7
यामध्ये शेवया बनवणे, उडीद, मूग अशा विविध प्रकारच्या डाळींचे पापड बनवण्यासाठी पीठ तयार करून देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून जाधव महिन्याकाठी जवळपास 60 हजार रुपयांची कमाई करतात असे त्यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
3/7
राजश्री जाधव यांचा लघुउद्योग व्यवसाय दैनंदिन गरजेच्या उत्पादनांवर आधारित आहे. त्या मुख्य म्हणजे शेवया बनवणे, उडीद, मूग डाळींपासून विविध प्रकारच्या पापडांसाठी पीठ तयार करून देण्याचे काम करतात.
advertisement
4/7
त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि स्वच्छता यामुळे कमी वेळातच ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ही उत्पादने घरोघरी वापरली जातात, त्यांना वर्षभर मागणी असते. त्यांच्या व्यवसायाची वाढ ही त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि योग्य ग्राहक सेवा देण्याच्या वृत्तीचे प्रतीक आहे.
advertisement
5/7
लघुउद्योग त्यांच्या सासऱ्यांनी 15 वर्षांपूर्वी सुरू केला होता. तसेच उन्हाळ्याच्या सीझनमध्ये चांगली कमाई होत असल्याचे देखील जाधव यांनी सांगितले आहे.
advertisement
6/7
ग्राहकांची मागणी असल्यामुळे त्यांच्या शेवया विदेशात देखील पाठवल्या जातात. शेवया, मूग, उडीद डाळ पीठ धडा आणि किलोवर बनवून दिले जाते. याची उत्पादनानुसार वेगवेगळी किंमत आहे.
advertisement
7/7
त्यांचा हा व्यवसाय केवळ आर्थिकदृष्ट्या मर्यादित नाही तर तो त्यांना समाजात एक वेगळी ओळख निर्माण करून देत आहे. त्यांच्या या यशामुळे चिकलठाणा आणि आसपासच्या परिसरातील महिलांनाही स्वयंरोजगारासाठी मोठी प्रेरणा मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story: गृहिणी बनली उद्योजिका, लघु उद्योगानं पालटलं नशीब, प्रत्येकांनी वाचावी अशी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल