1 फेब्रुवारीला बजेट मग Share Market सुरू राहणार की बंद? BSE-NSE चा मोठा निर्णय
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
१ फेब्रुवारीला रविवार असूनही अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार आहेत, NSE आणि BSE ने ट्रेडिंग सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
advertisement
1/6

2017 पासून प्रत्येक वर्षी 1 फेब्रुवारीला बजेट सादर केलं जातं. मात्र यावर्षी थोडा पेच तयार झाला आहे. बजेट सत्र 28 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी यावेळी रविवार असल्याने बजेट सादर होणार की नाही अशी शंका होती. मात्र त्यावर उत्तर आलं आहे. आता १ फेब्रुवारी रोजी रविवार असला तरी बजेट सादर होणार आहे.
advertisement
2/6
१९९९ नंतर आता पुन्हा एकदा रविवार दुसऱ्यांदा बजेट सादर केलं जाणार आहे. 25 वर्षांत पहिल्यांदाच रविवारी बजेट सादर केलं जाणार आहे. त्यामुळे रविवारी बजेट सादर होत असल्याने यावेळी शेअर मार्केटचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
3/6
रविवारी आणि शनिवारी साधारणपणे शेअर मार्केटला सुट्टी असते. मात्र बजेट दिवशी शेअर मार्केट सुरू राहणार आहे. सकाळी 9.30 ते 3.30 या काळात शेअर मार्केट सुरू राहील. याशिवाय सामान्य दिवसांसारखंच ट्रेडिंग सुरू राहणार आहे.
advertisement
4/6
रविवारी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत बजेटचं भाषण वाचतील. विशेष म्हणजे, या घोषणांचा परिणाम पाहण्यासाठी शेअर बाजारही रविवारी सुरू ठेवण्याची तयारी सुरू आहे.
advertisement
5/6
बजेटचा परिणाम शेअर मार्केटवर होत असतो. कृषी सेक्टर, IT फर्म आणि सर्वसामान्य लोकांना काय मिळणार? सोन्या चांदीचे वाढणारे दर आणि टॅरिफ यावर अर्थमंत्री काय बोलणार याकडे सगळ्या कंपन्यांचंही लक्ष लागलं आहे.
advertisement
6/6
शुक्रवारी NSE ने आणि BSE ने याबाबत एक नोटीस जारी केली आहे. इतर कामकाजाच्या दिवशी जसं काम सुरू राहातं तसंच या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला रविवार शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग होणार आहे. त्यामुळे याची सर्व गुंतवणूकदारांनी नोंद घ्यावी असं म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
1 फेब्रुवारीला बजेट मग Share Market सुरू राहणार की बंद? BSE-NSE चा मोठा निर्णय