Silver Price Today: चर्चा सोन्याची होती, पण चांदी भाव खाऊन गेली! 1,50,000 रुपयांवर पोहोचले दर, आणखी किती वाढणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Silver Price Today: दसऱ्याआधी चांदीचे दर दीड लाखांवर पोहोचले आहेत. सोन्यापेक्षा चांदीला मागणी वाढली असून इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पॅनलमध्ये वापरामुळे दर वाढले आहेत.
advertisement
1/7

दसऱ्याआधी चांदीच्या दरांचा चांगलीच झळाळी आली आहे. दसरा तर दूरच त्याआधीच चांदीचे दर दीड लाख रुपयांहून अधिक पोहोचले आहेत. त्यामुळे आता चांदी घेणं आवाक्याबाहेर झालं आहे. चांदीच्या दरांनी वर्षभरात जवळपास तीनपट अधिक रिटर्न दिले आहेत. सोन्याला मागे टाकून ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याऐवजी आता लोक चांदी खरेदीकडे वळत आहेत.
advertisement
2/7
जानेवारीपासून चांदीचे दर 60 हजार 300 रुपयांनी वाढले आहेत. जवळपास हे दर 67.22 टक्के असल्याचं एक्सपर्टचं म्हणणं आहे. 31 डिसेंबर रोजी चांदीचे दर 89 हजार 700 रुपये प्रति किलोवर होते. आज हेच दर दीड लाख रुपयांहून अधिक झाले आहेत. त्यामुळे ज्यांनी चांदी घेतली नाही त्यांना आता पश्चाताप होत आहे.
advertisement
3/7
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेली सध्याची परिस्थिती, अस्थिर मार्केट, वाढणारी मागणी, याशिवाय चांदीचा वापर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये देखील केला जातो त्यामुळे त्याची मागणी वाढत आहे. याशिवाय चांदी रिटर्न चांगले देत असल्याने लोक सोनं सोडून चांदीकडे वळत आहेत.
advertisement
4/7
शेअर मार्केट ऐवजी लोक सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यावर जास्त भर देत आहेत. ही गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जात आहे. यापेक्षा चांदीचे दर काही फार कमी होणार नाही. तसा यंदा कोणताही ट्रेंड दिसत नाही. त्यामुळे लोक आता वेगवेगळ्या मार्गानं चांदी खरेदी करत आहेत.
advertisement
5/7
अमेरिकेतली फेड रिझर्व्ह बँक भविष्यात व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. याशिवाय डॉलर कमजोर होईल अशी भीती असल्याने चांदीने आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. सोन्याच्या दरांपेक्षा मागे राहणाऱ्या चांदीने मागच्या दीड ते दोन महिन्यात ऐतिहासिक उसळी मारली आणि दीड लाखांचा टप्पा पार केला.
advertisement
6/7
दसऱ्यापर्यंत चांदीचे दर वाढतील असा तज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र दसऱ्या आधीच आष्टमीला चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. चांदीचे दर प्रति किलो 1 लाख 51 हजार 670 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर GST सह हे दर 1 लाख 48 हजार 281 रुपयांवर पोहोचले आहेत.
advertisement
7/7
इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पॅनल, वाहानं, इंडस्ट्रीयल वापरासाठी चांदीचा वापर होतो. त्यामुळे या सगळ्या वस्तू देखील महाग होण्याची शक्यता आहे. याशिवाय येत्या काळात चांदीची दरवाढ कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज एक्सपर्टने व्यक्त केला आहे. त्यामुळे चांदीमध्ये ETF, कॉईनची गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. मात्र हे खरेदी करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Silver Price Today: चर्चा सोन्याची होती, पण चांदी भाव खाऊन गेली! 1,50,000 रुपयांवर पोहोचले दर, आणखी किती वाढणार?