HDFC Bankचे शशिधर जगदीश बनले जास्त वेतन मिळणारे बँकर, सॅलरी पाहून व्हाल अवाक्
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Highest Paid Banker in India: देशातील सर्वात जास्त सॅलरी मिळवणाऱ्या बँकर्सच्या लिस्टमध्ये शशिधर जगदीश टॉपवरआहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांची सॅलरी किती...
advertisement
1/6

मुंबई, 7 ऑगस्ट: भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC चे MD आणि CEO शशिधर जगदीश 2022-23 या आर्थिक वर्षात सर्वाधिक सॅलरी मिळवणारे बँकर्स म्हणून समोर आलेय. त्यांना 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 10 कोटी 55 लाख रुपये पगार देण्यात आला आहे.
advertisement
2/6
रिपोर्टनुसार, शशिधर जगदीशन यांच्या आधी, एचडीएफसी बँकेचे डिप्टी मॅनेजिंग डायरेक्टर के कैसाद भरुचा यांना गेल्या आर्थिक वर्षात 10 कोटी रुपये दिले गेले होते. आता यावेळी शशिधर यांनी सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत आपल्या सहकाऱ्याला मागे टाकले आहे.
advertisement
3/6
शशिधर जगदीशन यांच्या 10.55 कोटी रुपये सॅलरीचं स्ट्रक्चर कसं आहे ते पाहूया. त्यांची बेसिक सॅलरी 2.82 कोटी रुपये आहे. अलाउंसेस 3.31 कोटी रुपये आहे. पीएफ अमाउंट 33.92 लाख रुपये आहे. परफॉरमेंस बोनस 3.63 कोटी रुपये आहे.
advertisement
4/6
दुसरा क्रमांक कोणाचा? - अॅक्सिस बँकेचे अमिताभ चौधरी या आर्थिक वर्षातील सर्वाधिक पगार असलेल्या बँक सीईओंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ज्यांना 9.75 कोटी रुपये वेतन मिळाले आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आयसीआयसीआय बँकेचे संदीप बक्षी आहेत. ज्यांना 9.60 कोटी रुपये वेतन देण्यात आले आहे.
advertisement
5/6
कोटक महिंद्रा बँकेत 26% स्टेक असलेले उदय कोटक यांनी फक्त रु पगार घेतला आहे. त्यांनी कोविड-19 दरम्यान 1 रुपये पगार घेण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्येही सुरू ठेवला.
advertisement
6/6
बँक कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढले?- ICICI बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 11% वाढ झाली आहे. त्याच वेळी, अॅक्सिस बँकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारात 7.6% वाढ झाली आहे. एचडीएफसी बँकेबद्दल बोलायचे झाले तर येथील कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 2.51% वाढ झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
HDFC Bankचे शशिधर जगदीश बनले जास्त वेतन मिळणारे बँकर, सॅलरी पाहून व्हाल अवाक्