Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ! चांदीही चकाकली, अमेरिका-ईरान युद्धाचा परिणाम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Gold Rate Today: अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आज सोने आणि चांदीमध्ये जोरदार खरेदी सुरु आहे. भारतात एमसीएक्सवर दोन्हीही मौल्यवान धातुंच्या किंमती तीन टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही गोल्ड-सिल्व्हरच्या किंमती वेगाने वाढल्या आहेत.
advertisement
1/5

नवी दिल्ली : अमेरिका इस्रायल-इराण युद्धामुळे वाढलेल्या तणावामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोनं 4759 रुपयांनी महाग होऊन 166880 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीची आज तीन टक्क्यांनी वाढून 291439 रुपयांवर ट्रेड करत आहे.
advertisement
2/5
कॉमेक्सवर सुरुवाती व्यवहारा दरम्यान सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या स्पॉट किंमत 1.86%वाढून 5,345.50 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. तर चांदीची 0.81% च्या वाढीसह 94.045 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
advertisement
3/5
पाहा कुठे किती सुरु आहे सोन्याचा भाव : मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार 24 कॅरेट सोनं चेन्नईमध्ये 17,210 रुपये प्रति ग्रामवर मिळतंय. तर मुंबई, कोलकाता, बंगळुरु, हैद्राबाद, केरळ आणि पुण्यात 17,309 रुपये प्रति ग्रामवर सुरु आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 17,234 रुपये प्रति ग्राम तर वडोदरा आणि अहमदारबादमध्ये 17,314 रुपये प्रति ग्रामवर विक्री होत आहे.
advertisement
4/5
सोन्याच्या किंमती आणखी वाढणार? : बाजार विश्लेषकांच्या मते तणाव असाच सुरु राहिला तर नजीकच्या भविष्यात स्थानिक बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 1.70 लाख रुपये आणि चांदी प्रति किलो 3 लाख रुपये पर्यंत पोहोचू शकते.
advertisement
5/5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुरवठा खंडित होण्याच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जोखीम कमी करण्याची भावना बळकट झाली आहे, ज्यामुळे सोन्याची मागणी आणखी वाढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ! चांदीही चकाकली, अमेरिका-ईरान युद्धाचा परिणाम