सावधान! सिबिल आणि क्रेडिट स्कोअरला एकच समजताय? मग हे वाचाच!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
TransUnion CIBIL, Experian, Equifax, CRIF High Mark या कंपन्या क्रेडिट स्कोअर देतात. सिबिल स्कोअर म्हणजेच क्रेडिट स्कोअर, ७५० पेक्षा जास्त स्कोअरवर कर्ज मिळते.
advertisement
1/6

सिबिल स्कोअर चांगला नाही म्हणून लग्न मोडल्याच्या घटना ऐकल्या आहेत. पण सिबिल स्कोअर आणि क्रेडिट स्कोअर म्हणजे नेमकं काय? या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे हे दोन्ही एकच आहे की वेगवेगळं असं कन्फुजन अजूनही अनेकांमध्ये आहे. तर आज आपण या दोन्हीमधला फरक आणि दोन्हीचा उपयोग कशासाठी होतो ते सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
advertisement
2/6
प्रत्येकाच्या तोंडी सिबिल स्कोअर किती आहे? हाच प्रश्न असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्याला तुम्ही सिबिल स्कोअर म्हणता, तो प्रत्यक्षात तुमचा क्रेडिट स्कोअर असतो? हो, हे वाचून आश्चर्य वाटलं असेल, पण या दोन्हीमध्ये एक पुसटशी पण महत्त्वाची रेषा आहे.
advertisement
3/6
अनेकांना वाटतं की फक्त सिबिलच स्कोअर देते. पण भारतात एकूण ४ प्रमुख कंपन्या आहेत ज्या तुमचा स्कोअर ठरवतात: १. TransUnion CIBIL (सर्वात जुनी आणि लोकप्रिय) २. Experian ३. Equifax ४. CRIF High Mark. जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेत कर्जासाठी जाता, तेव्हा ती बँक यापैकी कोणत्याही कंपनीचा रिपोर्ट मागवू शकते. पण भारतात 'सिबिल'चा दबदबा जास्त असल्यामुळे 'क्रेडिट स्कोअर'लाच 'सिबिल' असं संबोधलं जाऊ लागलं.
advertisement
4/6
तुमचा सिबिल स्कोअर ७८० असू शकतो, तर त्याच वेळी एक्सपेरियन स्कोअर ८१० असू शकतो. कारण प्रत्येक कंपनीची स्कोअर मोजण्याची पद्धत थोडी वेगळी असते. बहुतेक सरकारी आणि मोठ्या खासगी बँका आजही 'सिबिल'च्या रिपोर्टवरच जास्त विश्वास ठेवतात.
advertisement
5/6
या सर्व कंपन्यांना डेटा तुमची बँकच पुरवते, पण तो डेटा मांडण्याची आणि त्याचे विश्लेषण करण्याची पद्धत प्रत्येक संस्थेची भिन्न असते. तुम्ही गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेणार असाल, तर फक्त सिबिलवर अवलंबून राहू नका. इतर कंपन्यांचे स्कोअरही तपासा.
advertisement
6/6
कधीकधी सिबिलमध्ये चूक असू शकते, जी एक्सपेरियनमध्ये नसते. अशा वेळी तुम्ही बँकेला दुसऱ्या कंपनीचा रिपोर्ट देऊन आपली आर्थिक पत सिद्ध करू शकता. स्कोअर कोणताही असो, तो ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो आणि ७५० च्या वर असल्यास तुम्हाला स्वस्त दरात कर्ज मिळण्याचे मार्ग मोकळे होतात!