TRENDING:

22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये काय फरक? रोजच्या वापरासाठी कोणतं बेस्ट?

Last Updated:
22, 23, 18, 20 हे कॅरेट काय आहेत ते आधी समजून घ्या. त्यानंतर रोजच्या वापरासाठी किती कॅरेटमध्ये दागिने करणं फायद्याचं आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
1/7
22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये काय फरक? रोजच्या वापरासाठी कोणतं बेस्ट
22 कॅरेट सोनं सर्वात बेस्ट म्हणून तुम्ही जर 22 कॅरेट सोनं घेण्याचा हट्ट नेहमी धरत असाल तर थांबा, तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. 22, 23, 18, 20 हे कॅरेट काय आहेत ते आधी समजून घ्या. त्यानंतर रोजच्या वापरासाठी किती कॅरेटमध्ये दागिने करणं फायद्याचं आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. नाहीतर काय ज्यांच्याकडे पैसे आहे ते तर 22 काय अन् 23 काय कितीही कॅरेटमध्ये करु शकतात त्याबाबत काय अडचण नसते. मात्र ज्यांना खरंच घतलेले दागिने सतत तुटू नये असं वाटत असेल त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
advertisement
2/7
22 आणि 18 कॅरेट दागिने म्हणजे 22 आणि 18 हे सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाण असतं, त्यासोबत इतर धातू मिसळले जातात. 18 पेक्षा 22 कॅरेटमध्ये सोनं जास्त असतं. त्यामागे नेमकं कारण काय? कॅरेटने शुद्धता मोजली जाते.
advertisement
3/7
22 कॅरेटमध्ये सोन्याचं प्रमाण 100 टक्क्यांपैकी 91.67 टक्के असतं. त्यासोबत चांदी, तांबे असं इतर धातू मिसळले जातात. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं, त्यासोबत चांदी, तांबे, इतर धातू मिसळले जातात. 18 कॅरेटचे दागिने इतर धातू त्यामध्ये जास्त मिसळल्याने अधिक मजबूत असतात. दागिने मोडण्याचा, तुटण्याचा धोका कमी असतो. त्यासाठी येणारा खर्चही 22 कॅरेटपेक्षा कमी असतो.
advertisement
4/7
य़ा दोन्हीमध्ये तांबे, चांदी, जस्त, पॅलेडियम, सारख्या इतर धातूंचं प्रमाण मिक्स केलं जातं. याशिवाय प्रत्येक सराफ हे धातू कोणते आणि कसे मिसळतो यावर देखील सोन्याची चकाकी आणि मजबूती अवलंबून असते. सगळ्यात जास्त तांब मिसळलं जातं. तो सोन्याला लालसर रंग आणि मजबूती देतो.
advertisement
5/7
झिंक आणि चांदी सोन्याला चकाकी द्यायला मदत करतात. 18 कॅरेटमध्ये याचा जास्त उपयोग केला जातो. तिथे तांबं जास्त मिसळलं जात नाही. निकल आणि पॅलेडियम याचा उपयोग पांढऱ्या सोन्यासाठी होतो. यामुळे काहीवेळा अॅलर्जी होण्याची शक्यता असते.
advertisement
6/7
शुद्ध सोनं एकदम मऊ असतं, जसा आकार देऊ तसं वळतं, ते मोडण्याची भीती असते. त्याला नीट आकारही देता येत नाही. त्यामुळे त्यामध्ये इतर धातू मिसळून त्यापासून दागिने तयार केले जातात. त्या दागिन्यांवर नक्षीकाम करण्यासाठी त्याला थोडा ताठपणा आणावा लागतो. २२ आणि २० आणि 18 कॅरेटचे दागिने खरेदी करताना कायम होलमार्कचेच दागिने खरेदी करावे.
advertisement
7/7
होलमार्क असलेले दागिने होलमार्क खरा आहे की फसवा तेही तपासून पाहावं. दागिन्यांची रिसीट घेताना जीएसटीचे घ्यावे, कच्चे घेऊ नये त्यातून फसवणूक होण्याचा धोका असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये काय फरक? रोजच्या वापरासाठी कोणतं बेस्ट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल