Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, अवकाळी संकट टळलं, पण हवामान विभागाचा नवा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. महिनाभरापासून असणारं अवकाळीचं संकट टळलं आहे.
advertisement
1/7

गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रावर अवकाळी संकटाचं सावट कायम होतं. आता मात्र राज्यात हवापालट झाल्याचं चित्र आहे. आज, 8 एप्रिल रोजी राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा अलर्ट नाही. हवामान मुख्यतः कोरडे आणि उन्हाळी असेल. अवकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले असून तापमानात हळूहळू वाढ होईल.
advertisement
2/7
मुंबईसह कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. अवकाळीचा धोका टळला असून उन्हाचा पारा चढला आहे. आज पावसाची शक्यता नाही. हवामान कोरडे, उष्ण आणि दमट राहील. कमाल तापमानाचा पारा 31-35 अंशांच्या दरम्यान राहील. पुढील काही दिवसांत तापमानात 2-3 अंशांची वाढ होईल.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रात अवकाळीनं मोठे नुकसान केले. मात्र, आता वादळी पावसाचा धोका टळला आहे. आज पुणे, सोलापूरसह कोणत्याही जिल्ह्याला वादळी पावसाचा इशारा नाही. हवामान उन्हाळी आणि मुख्यतः कोरडे राहील. कमाल तापमान 32-38 अंशांच्या दरम्यान राहील. 9 एप्रिलला मात्र सोलापूर, सांगली परिसरात पुन्हा पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातून अवकाळी पावसाने माघार घेतली आहे. आज नाशिकसह कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा अलर्ट नाही. मात्र येत्या काळात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आज कमाल तापमान 38 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात आज अवकाळी पावसाने ब्रेक घेतला आहे. 9 एप्रिल रोजी लातूरसह काही जिल्ह्यांत पुन्हा पावसाची शक्यता आहे. परंतु, अवकाळीचा धोका तुलनेने कमी झाला आहे. कमाल तापमानात वाढ होत असून आज पारा 35-39 अंशांच्या दरम्यान राहील. उष्णता वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
advertisement
6/7
विदर्भात गेल्या काही दिवसांत झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले. आता मात्र हवामानाची स्थिती बदलली आहे. अवकाळीचा धोका कमी झाला असला तरी आता उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. आज हवामान कोरडे राहणार असून पारा 36 ते 41 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
advertisement
7/7
दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी अवकाळीचा धोका कमी राहील. मात्र, गुरुवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुन्हा पावसाची शक्यता आहे. 2-3 दिवसांनंतर तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून पारा 2-4 अंशांनी वाढेल. मुंबईसारख्या ठिकाणी दमट हवामानामुळे अस्वस्थता जाणवू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, अवकाळी संकट टळलं, पण हवामान विभागाचा नवा अलर्ट