TRENDING:

Weather Alert: कोकणात वारं फिरलं, मंगळवारी हवामानात मोठे बदल, मुंबई-ठाण्यात कोणता अलर्ट?

Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. मुंबई-ठाण्यात आज पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
1/5
कोकणात वारं फिरलं, मंगळवारी हवामानात मोठे बदल, मुंबई-ठाण्यात कोणता अलर्ट?
नोव्हेंबरची सुरुवात झाली असली तरी हवामान अजूनही पावसाळ्यासारखं जाणवतंय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणात रिमझिम सरी सुरुच आहेत. आज म्हणजेच 4 नोव्हेंबर 2025 रोजीही हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शहरांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय.
advertisement
2/5
मुंबईत आज सकाळपासून वातावरण दमट आणि ढगाळ आहे. काही ठिकाणी हलक्या सरी तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येतोय. दुपारनंतर पुन्हा अधूनमधून पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सियस, किमान तापमान 25 अंश सेल्सियस, तर आर्द्रता सुमारे 75% राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई भागातही कालपासून रिमझिम ते मध्यम पावसाच्या सरी सुरू आहेत. आज दिवसभर आभाळ भरून राहील, दुपारी अधूनमधून सरी पडतील. या दोन्ही भागांमध्ये दिवसाचं कमाल तापमान 30 अंश, तर किमान 24 अंश सेल्सियस राहील.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यातही वातावरण दमट असून हवामान विभागाने मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असं सांगितलं आहे. ग्रामीण भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येऊ शकतात. तापमान 32 अंश कमाल आणि 25 अंश किमान राहील.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवर आज पुन्हा पावसाचे ढग घोंघावत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी पडतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. समुद्रकिनाऱ्यालगत वाऱ्याचा वेग थोडा वाढलेला राहील. कमाल तापमान 30 ते 32 अंश, तर किमान 24 अंश सेल्सियस राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणात वारं फिरलं, मंगळवारी हवामानात मोठे बदल, मुंबई-ठाण्यात कोणता अलर्ट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल