TRENDING:

आता आई नाही व्हायचं! आधी एग्ज फ्रिज केले आता मराठी अभिनेत्रीला नकोय मूल, स्वत:च सांगितलं कारण

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं मूल व्हावं यासाठी एग्ज फ्रीज केले पण आता तिला आई व्हायचं नाही. यामागचं कारण तिने स्वत: सांगितलं.
advertisement
1/9
आता आई नाही व्हायचं! आधी एग्ज फ्रिज केले आता मराठी अभिनेत्रीला नकोय मूल
लग्न करावं त्यानंतर स्वत:चं मूल असावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला देखील लग्नानंतर तिचं मूल हवं होतं, तिला आई व्हायचं होतं. त्यासाठी तिनं तिचे एग्ज फ्रिज केले. 
advertisement
2/9
पण आता अभिनेत्रीचा निर्णय बदलला. आता तिला आई व्हायचं नाही असं तिनं सांगितलं. यामागचं कारणही तिनं सांगितलं.
advertisement
3/9
भविष्याचा विचार करून हल्ली एग्ज फ्रिज करण्याला अनेक महिला प्राधान्य देतात. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांचे एग्ज फ्रिज केल्याचं आपण ऐकलं आहे. काही अभिनेत्रींनी एग्ज फ्रिज करून आई देखील झाल्या आहेत.
advertisement
4/9
या मराठी अभिनेत्रीला देखील आई व्हायचं होतं. आज ती सहा वर्षांचा सुखी संसार करतेय. भविष्याचा विचार करून तिनं तिचे एग्ज फ्रिज केले होते. मात्र त्यानंतर अचानक तिने आता आई व्हायचं नाही असं ठरवलं.
advertisement
5/9
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे, 'भाग्यलक्ष्मी', 'मे आय कम इन मॅडम' सारख्या मराठी, हिंदी मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली. मराठी, हिंदी तसंच साऊथमध्येही तिनं काम केलं.
advertisement
6/9
नेहानं 2020 मध्ये शार्दुल बायसबरोबर लग्न केलं. तिच्या लग्नाला आता सहा वर्ष झाली आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नेहा म्हणाली, "मला आई व्हायचं नाही. लग्नाला सहा वर्ष झाली पण मला आई होण्याची इच्छा नाही. हा काही मी एका झटक्यात घेतलेला निर्णय नाही."
advertisement
7/9
"मी माझे एग्ज फ्रीज केले आहेत. कारण लग्नानंतर मला एका पॉइंटला आई व्हायची तीव्र इच्छा झाली होती. पण तेव्हा मी आई होऊ शकले नाही. त्या प्रक्रियेत मी खूप निराश झाले होते."
advertisement
8/9
नेहा पुढे म्हणाली, "मी इतकी वैतागले की आता नाही, आता मला आई नाही व्हायचंय' असं मी म्हणायला लागले. मग असं वाटलं की, कदाचित मी हे आत्ता रागात म्हणत असेन नंतर माझा विचार बदलूही शकतो. आपण एग्ज फ्रीज करुन घेऊ आणि वाटलं पुढे तर करू."
advertisement
9/9
"पण सध्या या पॉइंटला मला ती जबाबदारी नकोय. मी हे इतकं मोकळेपणानं बोलतेय कारण मला माहितीय माझ्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्या या निराशेतून जात असतील. कोणीतरी खरं बोलण्याची गरज आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आता आई नाही व्हायचं! आधी एग्ज फ्रिज केले आता मराठी अभिनेत्रीला नकोय मूल, स्वत:च सांगितलं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल