TRENDING:

Apple Cleaning : सफरचंद नुसतं पाण्याने धुवून खाऊ नका! असं साफ करा, तरंच निघतील फवारलेली रसायनं

Last Updated:
How to clean pesticides on apples : ती म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल, 'रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा.' पण हेच सफरचंद खाऊन जर तुम्हाला डॉक्टरकडे धाव घ्यावी लागली तर..? असं होऊ नये यासाठी सफरचंद व्यवस्थित साफ करणं आवश्यक आहे. चला पाहूया त्याची पद्धत.
advertisement
1/5
सफरचंद नुसतं पाण्याने धुवून खाऊ नका! असं साफ करा, तरंच निघतील फवारलेली रसायनं
सफरचंद साफ करणं म्हणजे फक्त पाण्याखाली धुणं पुरेसं नाही. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या मते, सफरचंद पाण्यात भिजवून नाही तर ते वाहत्या पाण्याखाली हाताने थोडे घासून धुवावे. पण तरीही फळांवरचे कीटकनाशकांचे अवशेष कसे काढावे? चला पाहूया याची योग्य पद्धत..
advertisement
2/5
मँचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी जर्नल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अँड फूड इंडस्ट्रीमध्ये एक अभ्यास प्रकाशित केला. या अभ्यासात सफरचंदांवरून कीटकनाशके काढण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती याची तपासणी करण्यात आली. संशोधनात थायबेंडाझोल आणि फॉस्मेट या दोन प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करण्यात आला.
advertisement
3/5
या प्रयोगामध्ये सफरचंदांना 24 तास या रसायनांच्या संपर्कात ठेवलं गेलं. त्यानंतर तीन वेगवेगळ्या पद्धती वापरून सफरचंद धुतले. पहिली पद्धत म्हणजे नळाचे पाणी, दुसरी म्हणजे क्लोरोक्स ब्लीच लिक्विड आणि तिसरी पद्धत म्हणजे पाणी आणि बेकिंग सोडाचे द्रावण. या तीन पद्धतींनी सफरचंद साफ केले गेले.
advertisement
4/5
यापैकी बेकिंग सोडा आणि पाण्याचे द्रावण जास्त प्रभावी ठरलं. या द्रावणात सफरचंद 12 ते 15 मिनिटे भिजवूनठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे सफरचंदावरील बहुतेक कीटकनाशकं निघून जातात. मात्र संशोधकांनी हेही सांगितलं की, सफरचंदाच्या सालीच्या आत गेलेली कीटकनाशकं पूर्णपणे काढता येणार नाहीत.
advertisement
5/5
सफरचंद सोलून खान हा त्यासाठी चांगला मार्ग असू शकतो, पण त्यामुळे सालीमध्ये असलेल्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचे फायदे आपल्याला मिळत नाहीत. सफरचंद स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा द्रावण वापरून पाहू शकता. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Apple Cleaning : सफरचंद नुसतं पाण्याने धुवून खाऊ नका! असं साफ करा, तरंच निघतील फवारलेली रसायनं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल