या टास्कमध्ये घरातील सदस्यांनी भन्नाट पात्रं साकारली आहेत. राखीने 'जुली मौंजुलिका' हे पात्र घेतलं आहे. तर रुचिता 'खुली मौंजुलिका' बनून सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. दोघींचा लूक आणि अॅक्टिंग पाहून घरातील सदस्यही थक्क झालेले दिसतात. इतकंच नाही तर या टास्कमध्ये इतर सदस्यांनीही वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. संकेत पाठक 'कवी कुमार' बनला आहे. तर प्रभू 'वेडा लवर'च्या भूमिकेत दिसत आहे. या सगळ्या पात्रांमुळे घरात एक वेगळंच वातावरण तयार झालं आहे.
advertisement
राखी आणि रुचिता या दोघींचा मौंजुलिका अवतार पाहून सागर पूर्णपणे हादरलेला दिसतो. दोघींना पाहिल्यानंतर तो आश्चर्याने म्हणतो, 'आयच्या गावात काय चाललंय घरात?' त्याची ही प्रतिक्रिया ऐकून घरातल्या सदस्यांमध्ये हशा पिकतो.
या टास्कमधला आणखी एक मजेशीर भाग म्हणजे संकेत, राखी, रुचिता आणि प्रभू यांनी बाईकवरून घराची राइड केली. ते घरात फिरताना बाकीचे सदस्य त्यांच्या सेवेसाठी उभे असल्याचंही दिसतं. या सगळ्या प्रकारामुळे घरात एक वेगळाच गोंधळ आणि मजेशीर वातावरण तयार झालं.
राखी आणि रुचिता यांची जोडी या टास्कमध्ये विशेष चर्चेत आहे. जुली मौंजुलिका आणि खुली मौंजुलिका या दोघींचा अभिनय आणि त्यांची मस्ती पाहून घरातील सदस्यांनाही हसू आवरत नाही. त्यांच्या संवादांमुळे आणि अजब वागण्यामुळे घरातला माहोल पूर्णपणे बदललेला दिसतो.
दरम्यान या टास्कचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. प्रेक्षकांनाही हा भूलभुलैयाचा धमाल खेळ खूपच आवडल्याचं दिसत आहे. आधी राखीच वेडेपणा करत होती मात्र आता तिच्यासोबतीने घरातील इतर सदस्य देखील वेडेपणा करताना दिसत आहेत. त्यामुळे आजचा एपिसोड पाहणं मजेशीर ठरणार आहे.
