TRENDING:

Easy Breakfast Recipe : नाश्त्यात काहीतरी नवीन हवंय? झटपट बनवा चिली गार्लिक बाजरी रोटी अन् ओट्स पुडिंग

Last Updated:
Millet garlic bread and oats date pudding recipe : नाश्त्यात काय बनवावं असा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्हाला देखील काही सुचत नसेल तर येथे दिलेल्या दोन्ही चविष्ट रेसिपी तुम्ही बनवू शकता. चिली गार्लिक बाजरी रोटी आणि ओट्स डेट पुडिंग बनवण्याची अगदी सोपी रेसिपी आपण येथे पाहणार आहोत. चिली गार्लिक बाजरी रोटी ही बाजरीच्या पीठात कांद्याची पात, लाल मिरची, जिरे, धणे आणि तूप घालून बनवली जाते. ही रोटी चविष्ट असण्यासोबतच पचायलाही हलकी असते.
advertisement
1/7
नाश्त्यात काहीतरी नवीन हवंय? झटपट बनवा चिली गार्लिक बाजरी रोटी अन् ओट्स पुडिंग
ओट्स डेट पुडिंग बनवण्यासाठी ओट्स, नारळाचे दूध, दालचिनी, खजूर आणि अक्रोड यांचा वापर केला जातो. हा चवदार पदार्थ शरीराला ऊर्जा देतो आणि निरोग राहण्यास देखील मदत करतो. नाश्ता किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही हे दोन्ही पदार्थ खाऊ शकता. धान्य, हिरव्या भाज्या आणि मसाल्यांपासून तयार केलेले अन्न केवळ चविष्ट नसून आरोग्याचीही पूर्ण काळजी घेते. हे पदार्थ शरीराला ताकद देतात. आज आपण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेल्या या दोन खास रेसिपींबद्दल जाणून घेणार आहोत.
advertisement
2/7
फूड ब्लॉगर कल्पना शर्मा यांच्या मते, चिली गार्लिक बाजरी रोटी बनवणे खूप सोपे आहे. यासाठी आवश्यक सामग्रीमध्ये 1 कप बाजरीचे पीठ, 1 ते 2 कप बारीक चिरलेली कांद्याची किंवा लसणाची पात, 1 छोटा चमचा कुटलेली लाल मिरची, चवीनुसार मीठ, छोटा अर्धा चमचा कुटलेले धणे, छोटा अर्धा चमचा जिरे, एक छोटा चमचा तूप हे साहित्य हवं.
advertisement
3/7
चिली गार्लिक बाजरी रोटी बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात बाजरीचे पीठ, हिरव्या लसणाची किंवा कांद्याची पात, लाल मिरची, मीठ, जिरे, धणे आणि तूप घालून एकत्र करा. त्यानंतर थोडे थोडे कोमट पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. पिठाला 5 मिनिटे ओल्या कापडाने झाकून ठेवा. त्यानंतर त्याचे गोळे करून थोडी जाडसर रोटी लाटून घ्या. शेवटी गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी रोटी नीट भाजून घ्या. तयार रोटीला साजूक तूप लावून चटणी किंवा भाजीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
advertisement
4/7
ओट्स आणि खजुर मिळून ओट्स डेट पुडिंग तुम्ही बनवू शकता. ही रेसिपी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक संतुलित पर्याय आहे. यासाठी अर्धा कप ओट्स, अर्ध्या कपपेक्षा थोडे जास्त नारळाचे दूध किंवा साधे दूध, अर्ध्या चमच्याहून कमी दालचिनी पावडर, 20 ग्रॅम बिया काढलेले आणि बारीक चिरलेले खजूर, 4 ते 5 चिरलेले अक्रोड आणि एक कप पाणी तुमच्याकडे तयार हवे.
advertisement
5/7
ओट्स डेट पुडिंग बनवण्यासाठी सर्वप्रथम एका खोल पॅनमध्ये पाणी उकळून घ्या. पाणी उकळू लागल्यावर त्यात ओट्स घाला आणि मंद आचेवर सतत ढवळत राहा, जेणेकरून ओट्स खाली चिकटणार नाहीत. मिश्रण घट्ट आणि क्रीमी होईपर्यंत शिजवा. आता यात दूध, दालचिनी पावडर आणि बारीक चिरलेले खजूर घाला. हे सर्व पदार्थ नीट मिसळून काही सेकंद पुन्हा शिजवा. यामुळे त्या सर्वांची चव एकजीव होईल.
advertisement
6/7
हे मिश्रण नीट शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि पुडिंग एका वाटीमध्ये काढून घ्या. ते थोडं थंड होऊ द्या. थंड झाल्यानंत त्यात वरून चिरलेले अक्रोड आणि खजुराचे तुकडे टाका. जर नारळाचे दूध उपलब्ध नसेल, तर तुम्ही साध्या दुधाचा वापरही करू शकता. हे दोन्ही पदार्थ तुमच्या नास्त्यात चवीसोबतच तुमचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Easy Breakfast Recipe : नाश्त्यात काहीतरी नवीन हवंय? झटपट बनवा चिली गार्लिक बाजरी रोटी अन् ओट्स पुडिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल