Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा हवापालट, उष्णतेची येणार लाट, हवामान खात्याकडून अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
विशेषतः मुंबईत उन्हाचा पारा चांगलाच चढला असून दुपारच्या वेळी कडक ऊन आणि उकाडा जाणवत आहे. हिवाळ्याने जवळपास पूर्णपणे निरोप घेतला असून उन्हाळ्याची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. पाहूया आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी हवामान राज्यात कसं असणार आहे.
advertisement
1/5

राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हवामानात पुन्हा बदल जाणवत आहे. काही भागांत मागील दोन दिवसांत ढगाळ वातावरण आणि अवकाळी सरी पाहायला मिळाल्या; मात्र आता उष्णतेचा प्रभाव पुन्हा वाढताना दिसत आहे. विशेषतः मुंबईत उन्हाचा पारा चांगलाच चढला असून दुपारच्या वेळी कडक ऊन आणि उकाडा जाणवत आहे. हिवाळ्याने जवळपास पूर्णपणे निरोप घेतला असून उन्हाळ्याची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. पाहूया आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी हवामान राज्यात कसं असणार आहे.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात आज प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामान राहील. सकाळी थोडा गारवा जाणवला तरी दुपारी सूर्याच्या तडाख्यात वाढ होईल. आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 35 ते 37 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमान 23 ते 25 अंशांच्या आसपास राहील. आकाश अंशतः स्वच्छ ते हलके ढगाळ राहील.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर परिसरात सकाळी वातावरण तुलनेने आल्हाददायक असले तरी दुपारनंतर कडक ऊन पडेल. कमाल तापमान 36ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहील. हवामान प्रामुख्याने कोरडे राहील.
advertisement
4/5
मराठवाड्यात 23 फेब्रुवारी रोजी उष्णतेचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, जालना आणि नांदेड या भागांत सकाळी हवामान कोरडे राहील; मात्र दुपारनंतर कडक उन्हामुळे उकाडा वाढेल. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, तर किमान तापमान 19 ते 22 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जाईल. आकाश बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता अत्यल्प आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडताना नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
advertisement
5/5
विदर्भात राज्यातील सर्वाधिक उष्णता जाणवेल. चंद्रपूरमध्ये 36-37 अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान जाईल. उष्णतेच्या लाटेची सुरुवात जाणवत आहे, पण अद्याप हीट वेव्हचा अलर्ट नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा हवापालट, उष्णतेची येणार लाट, हवामान खात्याकडून अलर्ट