ना दहन, ना दफन; कशी असते पारशी लोकांची अंत्यसंस्काराची पद्धत?
- Reported by:Kale Narayan
- Published by:News18 Marathi
Last Updated:
Parsi Funeral: पारशी लोक पृथ्वी, पाणी आणि अग्नी यांना अत्यंत पवित्र मानतात. त्यामुळे मृत व्यक्तीला अग्निडाग किंवा दफनविधी करत नाहीत.
advertisement
1/7

महाराष्ट्र आणि देशाच्या जडणघडणीत पारशी समुदायाचा मोठा वाटा आहे. पारशी धर्माला भारताबाहेर झोरोस्ट्रियन धर्म म्हणतात. पारशी समाज हा इराण वरून व्यापारासाठी भारतात आलेला समाज आहे. इंग्रजांची सत्ता भारतात असताना हा समाज मोठ्या प्रमाणावर भारतात विखुरला गेला.
advertisement
2/7
गेल्या सुमारे तीन हजार वर्षांपासून झोरोस्ट्रियन धर्मीय लोकांनी आपल्या धार्मिक परंपरा जपल्या आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व विधी धर्मानुसार ते करतात. मृत व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यविधीची पारशी समाजाची एक वेगळी पद्धत आहे. याबाबत जालना येथील इतिहास अभ्यासक रवीचंद्र खर्डेकर यांनी माहिती दिलीये.
advertisement
3/7
पारशी लोक पृथ्वी, पाणी आणि अग्नी यांना अत्यंत पवित्र मानतात, त्यामुळे समाजात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्याचे शरीर या तिघांच्या हाती दिले जात नाही. मृत व्यक्तीला अग्निडाग किंवा दफनविधी करत नाही. तर मृत व्यक्ती पशू पक्षांना खाण्यासाठी टॉवर ऑफ सायलेन्समध्ये ठेवण्यात येतो.
advertisement
4/7
पारशी लोक दोखमेनाशिनी या नावाने अंत्यसंस्कार करण्याची परंपरा पाळत आहेत. ही परंपरा चालवण्यासाठी हे लोक पूर्णपणे गिधाडांवर अवलंबून असतात. कारण गिधाडेच मृत शरीराला आपले खाद्य बनवतात.
advertisement
5/7
पारशी समाजतील व्यक्तींचा मृत्यू झाल्यावर सगळ्यात आधी मृतदेह बाजूला असेलल्या खोलीत ठेवला जातो. तिथे मान्यतेनुसार विधी केले जातात. त्यानंतर कुणी नातेवाईक येणार असतील त्यांच्यासाठी थांबले जाते. सगळे आप्तेष्ट आल्यानंतर मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्समध्ये आणला जातो.
advertisement
6/7
यानंतर आणखी काही विधी करून तिथे असलेल्या रकान्यात ठेवला जातो. यानंतर सगळे लोक बाजूलाच असलेल्या विहिरीवर जाऊन हातपाय स्वच्छ करतात. यानंतर आपापल्या घरी जातात. नंतर काही दिवसांनी मृतदेह पक्षांनी किती नष्ट केला हे पहिले जाते.
advertisement
7/7
जेव्हा संपूर्ण मृतदेह नष्ट होऊन फक्त हाडांचा सांगाडा शिल्लक राहील. तेव्हा तो सांगाडा टॉवर ऑफ सायलेन्समध्ये असलेल्या छोट्या आडात ढकलला जात जातो, अशा पद्धतीने पारशी समाजात अंत्यसंस्कार केले जातात, असं रवीचंद्र खर्डेकर यांनी सांगितले.