TRENDING:

Raj Thackeray : ..आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच आले एकत्र, काय होती प्रतिक्रिया? PHOTOS

Last Updated:
Raj Thackeray : मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर महायुतीची जाहीर प्रचार सभा होत आहे. यावेळी पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित आहेत.
advertisement
1/5
..आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच आले एकत्र, PHOTOS
लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरू आहे. शनिवारी (18 मे) संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. परिणामी आजचा दिवस प्रचार करण्यासाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे.
advertisement
2/5
मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित आहेत.
advertisement
3/5
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी दोघांनी एकमेकांकडे पाहून नमस्कार केला आहे.
advertisement
4/5
महायुतीच्या शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत यावेळी राज ठाकरे यांची सभा धडाडणार आहे. राज काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.
advertisement
5/5
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि कल्याणमध्ये रोड शो केला होता, त्यानंतर आता ते मुंबईत सभा घेणार आहेत. या सभेत पंतप्रधान काय बोलणार? मोदींच्या निशाण्यावर कोण असणार? ठाकरे, पवार की काँग्रेस हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Raj Thackeray : ..आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच आले एकत्र, काय होती प्रतिक्रिया? PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल