TRENDING:

Mumbai Rain: ऐन आषाढात पावसाचा ब्रेक, मुंबई, ठाण्यातील हवामानात मोठे बदल, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Mumbai Rain: मुंबईसह कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील काही दिवस मान्सूनचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
advertisement
1/5
ऐन आषाढात पावसाचा ब्रेक, मुंबई, ठाण्यातील हवामानात मोठे बदल, आजचा हवामान अंदाज
ऐन आषाढात पावसाने काहीसा ब्रेक घेतल्याचे चित्र सध्या महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर दिसत आहे. मागील दोन दिवस जोरदार सरी अनुभवलेले असतानाच, आज 13 जुलै रोजी मुंबईसह कोकणात पाऊस हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पडत आहे. काही भागांत रिमझिम सरी सुरू असून वातावरण ढगाळ आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांत विजांसह हलक्‍या पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
2/5
मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून वाऱ्याचा वेग सौम्य आहे. दुपारनंतर शहरात काही भागांत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः सायन, दादर, वांद्रे, चेंबूर या भागांत पावसाचे प्रमाण अधिक राहू शकते. तापमान 27°C ते 31°C दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. शनिवारपासून शहरातील काही भागांत रिमझिम पावसाने वातावरण दमट झाले आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात काल हलक्‍या सरी कोसळल्या. आजही याच पद्धतीने ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बेलापूर, वाशी, ठाणे स्टेशन आणि कल्याण-डोंबिवली या भागात संध्याकाळनंतर पावसाचा जोर थोडा वाढू शकतो.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे. वसई, विरार, डहाणू व जव्हार या भागांत हलक्‍या सरींची शक्यता आहे. कालदेखील काही भागांत पावसाचा अनुभव आला होता. हवामान विभागानुसार समुद्र किनाऱ्यालगत वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने मच्छीमार बांधवांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
5/5
कोकणात पावसाची स्थिती हलकी ते मध्यम आहे. रत्नागिरी व रायगडमध्ये शनिवारी जोरदार सरी पडल्यानंतर आज पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्येही काही भागांत सकाळपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर रत्नागिरीला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. डोंगराळ भागात काही ठिकाणी दाट धुके असून, प्रवाशांना आणि पर्यटकांना खबरदारी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: ऐन आषाढात पावसाचा ब्रेक, मुंबई, ठाण्यातील हवामानात मोठे बदल, आजचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल