TRENDING:

Astrology: आधीच उल्हास त्यात..! अडचणीत असलेल्या 3 राशींना मोठा झटका; अशुभ जडत्व योग अनलकी

Last Updated:
Astrology: आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी बुध ग्रहाचे राशी परिवर्तन होत आहे. बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 11 एप्रिल 206 पर्यंत याच राशीत राहील. कुंभ राशीत राहु आधीपासूनच विराजमान असल्याने बुध आणि राहुची युती होऊन 'जडत्व योग' तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग अशुभ आणि नकारात्मक मानला जातो. या योगामुळे तीन राशींच्या अडचणी वाढू शकतात, त्यामुळे 11 एप्रिलपर्यंत त्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
advertisement
1/6
आधीच उल्हास त्यात..! अडचणीत असलेल्या 3 राशींना मोठा झटका; अशुभ जडत्व योग अनलकी
कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात भ्रम आणि गोंधळाच्या स्थितीला सामोरे जावे लागू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्हाला अडचणी येतील आणि घाईघाईत घेतलेला एखादा चुकीचा निर्णय मोठे नुकसान करू शकतो. बुधाची ही चाल तुमच्यासाठी अडचणीची परिस्थिती निर्माण करेल, ज्यामुळे मानसिक आणि भावनिक संतुलन बिघडू शकते. 
advertisement
2/6
कर्क राशीच्या लोकांनी या काळात नवीन कामाची सुरुवात करणे टाळावे. अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका, जोपर्यंत बुध राहुसोबत आहे, तोपर्यंत मोठी गुंतवणूक करणे टाळलेलेच बरे.
advertisement
3/6
सिंह - बुध ग्रहाचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी कठीण परीक्षेचा काळ असू शकतो. या राशीवर आधीच शनीची अडीचकी सुरू आहे, त्यातच जडत्व योगामुळे आर्थिक स्थिती खालावण्याची शक्यता आहे. धनसंपत्तीची कमतरता भासू शकते आणि रखडलेल्या कामांमुळे मानसिक तणाव वाढेल.
advertisement
4/6
सिंह - नोकरीमध्ये विरोधकांचा त्रास किंवा कामाचा अतिदबाव जाणवेल. व्यापारी वर्गाला आपल्या बुद्धीचा पूर्ण वापर करणे कठीण जाईल, कारण संभ्रम तुमच्यावर हावी राहील. आरोग्याबाबत केलेली हलगर्जी महागात पडू शकते.
advertisement
5/6
मीन - जडत्व योग मीन राशीच्या लोकांसाठी दुहेरी संकट घेऊन येऊ शकतो. या राशीचे लोक आधीच शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहेत. राहु आणि बुध यांच्या युतीमुळे मीन राशीच्या लोकांचे खर्च अचानक वाढू शकतात.
advertisement
6/6
मीन - व्यापार किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेताना कमालीची सावधगिरी बाळगा, आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणेच तुमच्या हिताचे ठरेल. यासोबतच आरोग्याशी संबंधित तक्रारी देखील तुम्हाला सतावू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: आधीच उल्हास त्यात..! अडचणीत असलेल्या 3 राशींना मोठा झटका; अशुभ जडत्व योग अनलकी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल