TRENDING:

Kitchen Tricks : 'या' एका चुकीमुळं फुगत नाही चपाती! छोटासा बदल करा, टम्म फुगेल आणि बनेल मऊसूत..

Last Updated:
चपात्या बनवताना बऱ्याचदा त्या फुगत नाहीत, चापट किंवा पापडासारख्या कडक होतात. काहीवेळा आपल्याला कळतच नाही असं का होतं. पण एक छोटासा बदल करून आपण चपाती फुगलेली आणि मऊ बनवू शकतो.
advertisement
1/7
'या' एका चुकीमुळं फुगत नाही चपाती! छोटासा बदल करा, टम्म फुगेल आणि बनेल मऊसूत..
चपात्या बनवताना काही छोट्या छोट्या चुका त्या बिघडवण्याचं काम करतात. यामुळे चपात्या फुगत नाही आणि जास्त थोड्या वेळातच त्या कडक होऊ लागतात. म्हणूनच जेव्हा आपण डब्यासाठी चपात्या बनतो तेव्हा तेव्हा त्या फुगणं आणि मऊ राहणं गरजेचं असतं.
advertisement
2/7
कणिक मळताना तुम्ही कोणत्या प्रकारचं पाणी वापरावं याचा कधी विचार केला आहेका? खरं तर चपात्या आपण साधं पाणी जसं असेल तसं वापरतो. पण इथे एक हॅक तुम्ही वापरू शकता. पाण्याचे तापमान कणकेची गुणवत्ता कमी जास्त करू शकतात. म्हणून खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरू नका. त्याऐवजी कोमट पाणी वापरा. यामुळे कणिक चांगली मळली जाईल आणि मऊ होईल.
advertisement
3/7
टम्म फुगली आणि मऊसूत चपात्या बनवण्यासाठी कणिक व्यवस्थित मळून घेणं गरजेचं असतं. चपात्यांची कणिक मळताना त्यामध्ये सुरुवातीलाच जास्त पाणी घालू नका. यामुळं पीठ चिकट होतं नाहीतर एकसारखं मळलं जात नाही. म्हणून कणिक मळताना नेहमी थोडं थोडं पाणी घाला आणि हळूहळू मळा.
advertisement
4/7
कणिक एकसारखी मळली गेली नाही तर त्यामुळे चपात्याही कडक होऊ शकतात. त्याचा प्रमाणे कणिक मऊ होईपर्यंत मळा. कणकेला व्यवस्थित पाणी लागलं नाही तर त्यात कोरडं पीठ राहू शकतं. तसेच घाईघाई कणिक मळल्याने त्याचा पोत बिघडू शकतो. म्हणून कणिक कमीत कमी ५-८ मिनिटे हलक्या हाताने मळून घ्या.
advertisement
5/7
कणिक मळल्यानंतर तिला सेट होण्यासाठी थोडावेळ रेस्ट द्या. कणिक मळल्यानंतर लगेच चपात्या बनवायला घेतल्यास त्या कांदा होण्याची शक्यता वाढते. मऊ चपात्यांसाठी कणिक २०-३० मिनिटे झाकून ठेवा. या वेळेत ग्लूटेन व्यवस्थित सेट होते आणि चपात्या फुगतात, मऊ होतात.
advertisement
6/7
कणिक कोरडी किंवा रुक्ष वाटत असेल तर त्यात थोडं तेल किंवा तूप टाका. कणकेला तेल लावलं नाहीतर चपात्या लवकर कडक होतात. म्हणूनच कणकेमध्ये आवश्यक तितके तेल किंवा तूप नक्की टाका. अशा कणकेच्या चपात्या जास्त काळ मऊ राहतात.
advertisement
7/7
सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेस्ट देताना किंवा चपात्या बनवल्यानंतर कणिक उरली असेल ती अजिबात उघडी ठेऊ नका. कारण हवेमुळे उघड्या कणकेच्या वरचा थर कडक होतो आणि कणिक तशीच वापरल्यास चपात्यांना लाटताना भेगा पडू शकतात. म्हणून कणिक नेहमी ओल्या कापडाने झाकून ठेवावी. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tricks : 'या' एका चुकीमुळं फुगत नाही चपाती! छोटासा बदल करा, टम्म फुगेल आणि बनेल मऊसूत..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल