या निर्णयाचा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः परदेशात शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नोकरीसाठी महत्त्वाची कागदपत्रे पाठवणाऱ्या उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या कागदपत्रांची प्रक्रिया अडकून पडली असून, प्रवेश प्रक्रिया, व्हिसा कामकाज आणि इतर अधिकृत व्यवहारांमध्ये विलंब होत आहे. तसेच व्यावसायिक व्यवहारांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेत पोहोचत नसल्याने व्यापाऱ्यांनाही आर्थिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत.
advertisement
पुणेकरांचा प्रवास सुसाट! तळेगाव-चाकण औद्योगिक पट्टा कोंडीमुक्त होणार, मास्टर प्लॅन ठरला!
टपाल सेवा तुलनेने कमी खर्चात आणि विश्वासार्ह असल्यामुळे अनेक जण या सेवेचा वापर करतात. मात्र, सेवा बंद झाल्यामुळे काहींना खासगी कुरिअर सेवांचा पर्याय निवडावा लागत आहे. या सेवांचा खर्च अधिक असल्याने नागरिकांवर आर्थिक ताणही वाढत आहे. याशिवाय सर्व भागांत खासगी कुरिअर सेवा उपलब्ध नसल्याने अनेकांना पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे.
टपाल विभागाने स्पष्ट केले आहे की, ही बंदी तात्पुरती असून परिस्थिती स्थिर झाल्यानंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल. दरम्यान, ज्यांनी आधीच टपाल बुक केले आहे पण ते अद्याप पाठवले गेलेले नाही, अशा ग्राहकांना टपाल परत मागवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधितांनी अर्ज करावा लागणार असून प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे सात दिवसांचा कालावधी लागू शकतो. हवाई सेवा सुरळीत झाल्यानंतरच आंतरराष्ट्रीय टपाल सेवा पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






