advertisement

लोखंडी कड्यानं फोडलं कपाळ, मग डोक्यात घातला कोयता; पुण्यात अल्पवयीन मुलावर रात्रीच्या अंधारात भयंकर हल्ला

Last Updated:

आरोपींनी पीडित मुलाच्या कपाळावर लोखंडी कड्याने जोरदार प्रहार केला, तर डोक्याच्या मागील बाजूस कोयत्याने सपासप वार केले.

अल्पवयीन मुलावर हल्ला (प्रतिकात्मक फोटो)
अल्पवयीन मुलावर हल्ला (प्रतिकात्मक फोटो)
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोयता गँगची दहशत थांबण्याचे नाव घेत नाहीये. दापोडीतील पवार वस्ती भागात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भररस्त्यात लोखंडी कडे आणि कोयत्याने केलेल्या या वारामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. दापोडी पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्पीकर पाहण्याच्या बहाण्याने बोलावलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (२१ मार्च) रात्री सव्वा नऊच्या सुमारास हा थरार घडला. संशयित आरोपी सुफियान अन्सारी याने पीडित मुलाला "स्पीकर पाहायचे आहेत" असे सांगून पवार वस्ती येथे बोलावले होते. आपल्या चुलत भावांसोबत तिथे पोहोचलेल्या पीडित मुलाला संशयितांनी घेरले. काही समजण्याच्या आतच, जुन्या वादाचे निमित्त काढून आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला.
advertisement
डोक्यावर आणि कपाळावर वार
आरोपींनी पीडित मुलाच्या कपाळावर लोखंडी कड्याने जोरदार प्रहार केला, तर डोक्याच्या मागील बाजूस कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर आरोपींनी तिथून पळ काढला. जखमी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून शिफ्टेन खान, आझाम खान, सुफियान नौशाद अन्सारी आणि उमर (सर्व राहणार दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
दापोडी पोलीस सध्या या फरार आरोपींचा शोध घेत असून, अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली हिंसेची प्रवृत्ती पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
लोखंडी कड्यानं फोडलं कपाळ, मग डोक्यात घातला कोयता; पुण्यात अल्पवयीन मुलावर रात्रीच्या अंधारात भयंकर हल्ला
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement