TRENDING:

Weather Update : पुढील 4 तास महत्त्वाचे; मुंबईसह या जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा इशारा; IMD कडून रेड अलर्ट

Last Updated:
Rain Alert in Maharashtra : मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7
पुढील 4 तास महत्त्वाचे; मुंबईसह या जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा इशारा; रेड अलर्ट
मुंबईत पुढील दोन ते तीन तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे.
advertisement
2/7
कोकणातील जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने या भागात रेड अलर्ट जारी केला आहे. धोक्याचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं
advertisement
3/7
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील काही तासात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.
advertisement
4/7
याशिवाय पालघर, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
advertisement
5/7
पुढील 36 तास मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
6/7
तर, उद्याही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्या जवळपास संपूर्ण राज्यभऱातच मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे
advertisement
7/7
तर, कोकणात उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Update : पुढील 4 तास महत्त्वाचे; मुंबईसह या जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा इशारा; IMD कडून रेड अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल