TRENDING:

भारतातील सगळ्यात स्वस्त घरं! किंमत फक्त अडीच लाख रुपये, आहे कुठे पटापट पाहा

Last Updated:
Low Price House : स्वतःचं घर घेऊ पाहणाऱ्यांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण  देशातील पहिलं इकोफ्रेंडली घर साकारलं आहे, ज्याची किंमत फक्त अडीच लाख रुपये आहे.
advertisement
1/5
भारतातील सगळ्यात स्वस्त घरं! किंमत फक्त अडीच लाख रुपये, आहे कुठे पटापट पाहा
अडीच लाख रुपयांत घर... हे वाचूनच तुमचा विश्वास बसत नसेल. पण इतकं स्वस्त घर भारतात आहे. देशातील पहिलंच असं घर जे स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे.  या घरात बेडरूम, स्वयंपाकघर, शौचालय, बाथरूम आणि हॉलचा समावेश आहे.
advertisement
2/5
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घराची किंमत फक्त दीड लाख रुपये ठेवण्यात आली आहे. पण देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात हे घर बांधू इच्छिणाऱ्या कोणत्याही नागरिकाला अडीच लाख रुपये द्यावे लागतील.
advertisement
3/5
एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी राजीव सत्यकाम यांनी लोकल 18 ला सांगितलं की, हे घर 300 चौरस फूट आहे आणि त्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे. याचा अर्थ असा की एकूण 1.5 ते 2.5 लाख रुपयांमध्ये तुम्हाला पर्यावरणपूरक घर मिळू शकतं.
advertisement
4/5
हे घर इंटरलॉकिंग वॉल ब्लॉक्स औद्योगिक क्षेत्रांमधून येणाऱ्या राखेपासून बनवलं गेलंय, सोप्या भाषेत तुम्ही त्याला विटा म्हणू शकता. या ब्लॉक्सचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा ते रचले जातात तेव्हा ते कुलुपासारखे एकत्र येतात. ज्यामुळे सिमेंट, प्लास्टरची गरज नाही. राखेपासून बनवलेले हे इंटरलॉकिंग वॉल ब्लॉक्स इतके मजबूत आहेत की ते वादळ, चक्रीवादळे आणि भूकंप सहन करू शकतात. हे घर तुम्हाला उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवेल, ज्यामुळे एअर कंडिशनरची गरज राहणार नाही.
advertisement
5/5
पर्यावरणपूरक आणि बजेट-अनुकूल असलेले हे घर भविष्यात सामान्य लोकांसाठी घरांचं रूप बदलू शकतं. तुमच्या स्वप्नातील घराचं मालक होणं आता सोपं होत आहे. ही घरं मध्यमवर्गीय कुटुंबांची स्वप्नातील घरं असतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
भारतातील सगळ्यात स्वस्त घरं! किंमत फक्त अडीच लाख रुपये, आहे कुठे पटापट पाहा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल