TRENDING:

सूर्य आहे 'या' राशीत, 4 राशींसाठी शुभकाळ, 17 सप्टेंबरपर्यंत होणार मालामाल!

Last Updated:
17 ऑगस्टला सूर्याने कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश केला. आता हा काळ कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार, पाहूया.
advertisement
1/5
सूर्य आहे 'या' राशीत, 4 राशींसाठी शुभकाळ, 17 सप्टेंबरपर्यंत होणार मालामाल!
ग्रह, ताऱ्यांच्या दिशाबदलाचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर होत असतो. काही राशींसाठी तो सकारात्मक ठरतो, तर काही राशींसाठी नकारात्मक. सूर्य ग्रह सध्या सिंह राशीत आहे. येत्या 17 सप्टेंबरपर्यंत तो याच स्थितीत राहील. याचा चार राशींना प्रचंड लाभ होईल, असं देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंद किशोर मुद्गल यांनी सांगितलं. 17 ऑगस्टला सूर्याने कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश केला. आता हा काळ कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार, पाहूया.
advertisement
2/5
मेष : या राशीच्या व्यक्तींचं भाग्य सध्या कमालीचं त्यांच्या बाजूने आहे. आपण ठरवलेली सर्व कामं 17 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होतील. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे. विवाहित दाम्पत्याला मुलांकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबातील वातावरण छान प्रसन्न राहील.
advertisement
3/5
सिंह : सूर्य याच राशीत असल्याने या राशीच्या व्यक्तींचं आयुष्य प्रचंड प्रकाशमय होणार यात काही शंका नाही. या काळात आपल्याला आजारांपासून मुक्ती मिळेल. आपण मानसिक, शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हाल. व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्याला चहूबाजूंनी शुभवार्ता कळतील. आपण जे काही काम कराल त्यात यश मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर ही अत्यंत योग्य वेळ आहे.
advertisement
4/5
कन्या : या राशीच्या व्यक्तींसाठीही सूर्याची ही स्थिती सकारात्मक ठरणार आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात यश मिळेल. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. घरात शुभकार्य घडू शकतं. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. दाम्पत्य जीवनात सुख येईल.
advertisement
5/5
धनू : या राशीच्या व्यक्तींसाठीही उत्तम काळ आहे. आपण ठरवलेली कामं 17 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. शिवाय खर्च कमी होणार असल्याने चांगली बचत होईल. जमीन, घर, वाहनखरेदी आणि गुंतवणूकीसाठी अनुकूल वेळ आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
सूर्य आहे 'या' राशीत, 4 राशींसाठी शुभकाळ, 17 सप्टेंबरपर्यंत होणार मालामाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल