Independence day 2024: ... तर तुम्ही 15 ऑगस्टला तुमच्या गाडीवर लावू शकत नाही तिरंगा; समजून घ्या नियम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Independence day 2024 : कारवर झेंडा लावण्याआधी समजून घ्या नियम, फक्त याच खास व्यक्तींना असते परमिशन
advertisement
1/6

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाला गाडीवर झेंडा लावायचा विचार असेल तर थांबा, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तिरंगा लावण्याआधी त्याचे नियम समजून घ्या. कारवर तिरंगा लावण्याची परवानगी काही खास व्यक्तिंनाच दिली जाते.
advertisement
2/6
हर घर तिरंगा या योजनेंतर्गत लोक घरापासून ते गाडीपर्यंत सगळीकडे तिरंगा लावत आहेत. मात्र तुम्हाला माहितीय का राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी काही नियम आहेत. तसंच कारवर देखील तिरंगा लावण्याचे काही नियम आहेत. त्याची खास परवानगी दिली जाते.
advertisement
3/6
कारवर अथवा कारच्या आत तिरंगा लावण्याची परवानगी कोणा-कोणाला असते ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
4/6
भारतात 2002 मध्ये फ्लॅग कोड आणण्यात आला. या प्लॅग कोडनुसार हे नियम लावण्यात आले आहेत. ज्यांना परवानगी दिली आहे त्यांना या नियमाचं पालन करुनच आपल्या कारवर अथवा कारच्या आत तिरंगा लावता येतो.
advertisement
5/6
भारतीय ध्वज संहितेच्या नियमांनुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर, परराष्ट्र दूतावासाचे प्रमुख, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, मुख्यमंत्री, इतर कॅबिनेट मंत्री ध्वजारोहण करू शकतात. ध्वज याशिवाय लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती, राज्य विधानपरिषदांचे अध्यक्ष, विधानसभेचे सभापती हे आपल्या कारमध्ये तिरंगा लावू शकता.
advertisement
6/6
जर एखाद्या मान्यवरासोबत इतर देशांतील मान्यवर असतील अशा परिस्थितीमध्ये तिरंगा गाडीच्या उजव्या बाजूला आणि इतर मान्यवर असतील त्यांच्याही गाडीच्या डाव्या बाजूला लावायचा असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Independence day 2024: ... तर तुम्ही 15 ऑगस्टला तुमच्या गाडीवर लावू शकत नाही तिरंगा; समजून घ्या नियम