TRENDING:

बदलतेय मुंबई! मुंबईत समुद्रीमार्गे किती आणि कुठपर्यंत कोस्टल रोड बांधले जाणार? 

Last Updated:
New Coastal Road Project : मुंबईत नवीन कोस्टल रोड प्रकल्प सुरु आहे. कोस्टल रोड बांधून शहरातील वाहतुकीत सुधारणा करणे, ट्रॅफिक कमी करणे आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे या उद्दिष्टांसाठी हे प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
advertisement
1/5
बदलतेय मुंबई! मुंबईत समुद्रीमार्गे किती आणि कुठपर्यंत कोस्टल रोड बांधले जाणार? 
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. शहराच्या उत्तरेकडील भागातील कोंडी टाळण्यासाठी उत्तन ते विरारपर्यंत कोस्टल रोड बांधण्याचे काम सुरु आहे. या कोस्टल रोडची लांबी सुमारे 55 किमी असून त्यासाठी अंदाजे 34 हजार कोटी रुपयांचा खर्च कमी करण्यात आला आहे.
advertisement
2/5
मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतच्या कोस्टल रोडच्या यशस्वी प्रकल्पानंतर ज्यामुळे प्रवासाचा वेळ खुप कमी झाला आणि वाहतुकीत सुधारणा झाली आता अधिकारी शहराच्या उत्तरेकडील भागांमध्ये समान सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
advertisement
3/5
योजनेत असलेल्या उत्तन-विरार सी लिंक मुंबईच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर सतत वाहतूक कॉरिडॉर तयार करेल आणि वसई- विरार भागाला शहराच्या मुख्य वाहतूक नेटवर्कशी जोडेल. वांद्रे- वरळी सी लिंकच्या विस्ताराचा भाग असलेल्या या मार्गामुळे पश्चिम उपनगरांसाठी समांतर किनारी मार्ग तयार होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वर्सोवा- भाईंदर मार्गाशी अखंडपणे एकत्रित होऊन मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर सतत कनेक्टिव्हिटी मिळेल.
advertisement
4/5
एमएमआरच्या पूर्व भागातही मोठ्या प्रकल्पाची तयारी सुरु आहे. ठाणे, खारघर आणि उलवे या भागांना जोडण्यासाठी नवीन कोस्टल कॉरिडॉर विकसित केला जात आहे. ठाणे कोस्टल रोड मुंबई आणि नवी मुंबईला जाणाऱ्या रहिवाशांसाठी पर्यायी मार्ग असेल तर खारघर कोस्टल रोड शहरांतर्गत वाहतूक सुधारेल आणि येणाऱ्या मेट्रो मार्गांशी जोडली जाईल. नवी मुंबई विमानतळाजवळील उलवे कोस्टल रोड भविष्यातील व्यावसायिक जिल्ह्यांमध्ये वाहतूक सुलभ करेल.
advertisement
5/5
हे सर्व प्रकल्प मुंबईच्या शहरी वाहतुकीला वेग देण्यास, प्रवास सुलभ करण्यास आणि संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना देण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मरीन ड्राईव्ह-वरळी मार्गाप्रमाणे नवीन कोस्टल रोड्स शहरातील नागरिकांचा प्रवास सुलभ करेल
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
बदलतेय मुंबई! मुंबईत समुद्रीमार्गे किती आणि कुठपर्यंत कोस्टल रोड बांधले जाणार? 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल