TRENDING:

Thirty First Party : मुलगी थर्टी फर्स्ट पार्टीला जातेय पालकांनी काय करायचं? अशी घ्या स्मार्ट काळजी

Last Updated:
Thirty First Party Tips For Parents To Girls Safety : थर्टी फर्स्ट पार्टीसाठी मुलगी बाहेर जाते म्हणून धोका नसतो, जर मुलगी आणि पालकांमध्ये याबाबत संवाद नसेल तर मात्र धोका वाढतो.
advertisement
1/7
मुलगी थर्टी फर्स्ट पार्टीला जातेय पालकांनी काय करायचं? अशी घ्या स्मार्ट काळजी
पालक कितीही शिकलेले किंवा कितीही फॉरवर्ड विचाराचे असले तरी मुलगी पार्टीला जाणार म्हटलं की प्रत्येक आईबाबाची चिंता वाढते. त्यातही ती पार्टी थर्टी फर्स्टची पार्टी असेल तर मग टेन्शन जास्तच. किती तरी पालक मुलींना सरळ थर्टी फर्स्ट पार्टीसाठी नाही म्हणतात आणि पालकांनी नाही म्हटलं तरी काही मुली जबरदस्ती किंवा गुपचू पार्टीला जातात. त्यामुळे पालकांनी कंट्रोल नाही तर स्मार्ट काळजी घेण्याची गरज आहे.  31 डिसेंबरला थर्टी फर्स्ट पार्टीसाठी मुलगी जात असेल तर पालकांनी काय करायचं, यासाठी काही टीप्स
advertisement
2/7
आधी शांतपणे संवाद साधा. चौकशी न करता मित्रासारखं बोला. कोणासोबत, कुठे, कधी परत येणार हे प्रश्न विश्वासाने विचारा. घाबरवू नका, धमकी देऊ नका. संवाद असेल तर मुलगी सगळं सांगते. पार्टीच्या ठिकाणाची माहिती घ्या. पार्टी घरात आहे की हॉटेल, पब, फार्महाउसवर. पत्ता, गुगल लोकेशन घ्या. पार्टी होस्ट कोण म्हणजे पार्टी कुणी आयोजित केली आहे ते जाणून घ्या.
advertisement
3/7
तिचा फोन फुल चार्ज आहे याची खात्री करा. इंटरनेट ऑन ठेवायला सांगा. लाइव्ह लोकेशन ठेवायला सांगा. एमर्जन्सी कॉन्टॅक्ट डाइल स्पीडवर ठेवायला सांगा.
advertisement
4/7
ती पार्टीला कशी जाणार, कशी येणार ते विचारा. तुम्ही स्वतः सोडायला, आणायला जाणार असेल तर उत्तम. कॅब असेल तर ड्रायव्हर डिटेल्स शेअर करायला सांगा. स्क्रिनशॉट घ्या.
advertisement
5/7
दारू किंवा ड्रग्जबाबत स्पष्टच बोला. जबरदस्ती झाली तर नाही म्हणायचा हक्क आहे हे सांगा. अस्वस्थ वाटत असेल तर तिथून लगेच निघायला सांगा. स्वत:चं ड्रिंक स्वत:च घ्यायचं, अर्धवट ड्रिंक परत घेऊ नका, हे सांगा. एकटी जाऊ नको, ग्रुपमध्ये राहा, एकमेकींची काळजी घ्या असं सांगा. हे सगळं सांगताना तिला लेक्चर दिल्यासारखं वाटू नये, प्रॅक्टिकली त्याचं महत्त्व पटवून द्या.
advertisement
6/7
कधीपर्यंत परत येणार हे स्पष्ट करून घ्या. उशीर झाला तर फोन करायला सांगा. फोनवर सगळं बोलता येत नाही, हे लक्षात ठेवा. एमर्जन्सीसाठी एक कोड ठरवा. जसं की आई मला बरं वाटत नाही, म्हणजे पालकांनी लगेच घेऊन यायचं.
advertisement
7/7
जाऊ नकोस असं सरळ म्हणण्यापेक्षा काळजी घे आणि काही वाटलं तर लगेच कॉल कर असं सांगा.  थोडक्यात तर मुलाला सांगावा की स्वतःची सुरक्षिततेची भावना महत्त्वाची, पार्टी नाही स्वत:ची सुरक्षितता महत्त्वाची, काही चूक वाटलं तर लगेच बाहेर पड, आई-बाबा नेहमी तुझ्यासोबत आहेत, हा विश्वास तिला द्या. विश्वास दिला तर मुलगी मदत मागते. (सर्व फोटो : प्रतीकात्मक/ AI Generated, Canva)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Thirty First Party : मुलगी थर्टी फर्स्ट पार्टीला जातेय पालकांनी काय करायचं? अशी घ्या स्मार्ट काळजी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल