TRENDING:

रायगडमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाची मोठी कारवाई; तब्बल 5 टन मागूर मासे केले नष्ट

Last Updated:
रायगडमधून मोठी बातमी समोर येत आहे. मत्स्यव्यवसाय विभाग आणि पोलिसांनी चांबार्ली गावालगत असलेल्या मत्स्यसंवर्धन तलावांवर धाड टाकली. या धाडीमध्ये तलावांत मोठ्या प्रमाणात मागूर मासे आढळून आले आहेत.
advertisement
1/5
रायगडमध्ये मोठी कारवाई, तब्बल 5 टन मागूर मासे केले नष्ट
रायगडमधून मोठी बातमी समोर येत आहे. मत्सव्यवसाय विभाग आणि पोलिसांनी चांबार्ली गावालगत असलेल्या मत्स्यसंवर्धन तलावांवर धाड टाकली. या धाडीमध्ये तलावांत मोठ्या प्रमाणात मागूर मासे आढळून आले आहेत.
advertisement
2/5
हा मासा आरोग्य आणि पर्यावरणाला अपायकारक असल्यानं या माशांचे पालन आणि विक्रीला राज्यात बंदी आहे. मात्र असं असतानाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या माशांचं पालन सर्रासपणे सुरू आहे.
advertisement
3/5
चांबार्ली गावालगत असलेल्या मत्स्यसंवर्धन तलावांवर धाड टाकण्यात आली. यावेळी तब्बल 5 टन मागूर मासे जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेले मासे शास्त्रीय पद्धतीनं नष्ट करण्यात आले.
advertisement
4/5
तब्बल पाच टन मागूर मासे जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यामध्ये मीठ टाकून नष्ट करण्यात आले. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे कर्मचारी आणि पोलीस उपस्थित होते.
advertisement
5/5
पाताळगंगा नदी संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टनं याविरोधात अनेक वेळा आवाज उठवला आहे. मात्र तरी देखील या परिसरात या माशांचं उत्पादन सुरूच आहे. याविरोधात आता कारवाईला सुरुवात झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
रायगडमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाची मोठी कारवाई; तब्बल 5 टन मागूर मासे केले नष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल