Pune: हनुमान मंदिरासाठी खोदकाम सुरू असताना सापडली प्राचीन मूर्ती, गावकऱ्यांची एकच गर्दी, पहिले PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. गावातील बधलवाडी इथं हनुमान मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी सुरू असलेल्या पाया खोदकामादरम्यान एक १०० वर्ष जुनी....(अनिस शेख, प्रतिनिधी)
advertisement
1/7

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. गावातील बधलवाडी इथं हनुमान मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी सुरू असलेल्या पाया खोदकामादरम्यान एक १०० वर्ष जुनी हनुमानाची मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.
advertisement
2/7
मावळ तालुक्यातील नवलाखउंब्रे परिसराचा समृद्ध ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा उजेडात आला आहे. बधलवाडी येथील हनुमान मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी खोदकाम सुरू आहे.
advertisement
3/7
आज शुक्रवारी पाया खोदकामादरम्यान सुमारे 7 ते 8 फूट खोलीवर चपेटदान मुद्रेतील प्राचीन हनुमान मूर्ती सापडली. खोदकामादरम्यान मूर्ती सापडली ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.
advertisement
4/7
मूर्ती पाहण्यासााठी गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांनी एकच गर्दी केली होती. गावात तसंच इतिहासप्रेमींत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
5/7
इतिहास संशोधक डॉ प्रमोद बोऱ्हाडे यांच्याकडून या मूर्तीबद्दल जाणून घेतलं. त्यांनी सांगितलं की, 'ही मूर्ती किमान शंभर वर्षांहून अधिक काळ जुणी असून जमिनीत गाडलेली होती. ही मुर्ती कुठेही तुटलेली किंवा खंडित नाही.
advertisement
6/7
अखंड काळ्या शिळेत कोरलेली असून सुबक आणि देखणी अशी ही अडीच फूट उंच मूर्ती अत्यंत आकर्षक असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.
advertisement
7/7
नवलाख उंब्रेच्या मातीतील हा अद्भुत शोध केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा म्हणूनही अमूल्य ठरत आहे,
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune: हनुमान मंदिरासाठी खोदकाम सुरू असताना सापडली प्राचीन मूर्ती, गावकऱ्यांची एकच गर्दी, पहिले PHOTOS