भारत-पाकिस्तान मॅचचं तिकीट कितीला?
भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट नेमकं किती आहे? हे जाणण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात लीग स्टेजचा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याचं तिकीट फक्त 438 रुपये (1,500 श्रीलंकन रुपये) ठेवण्यात आलं आहे.
कसं बूक कराल तिकीट?
टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी चाहते बुक माय शो ऍपवरून घरबसल्या तिकीट काढू शकतात.
advertisement
काय आहे प्रक्रिया?
- सगळ्यात आधी बुक माय शो ऍपवर अकाऊंट असेल तर लॉग इन करा, अन्यथा अकाऊंट सुरू करून ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
- ऍप सुरू झाल्यानंतर वर्ल्ड कप टॅबवर क्लिक करा
- यानंतर तुम्हाला मॅच ज्या ठिकाणी बघायची आहे, ते निवडा
- भारतीय टीमचा सामना पाहायचा असेल, तर पेजवर थांबा आणि तिकीट लाईव्ह होईपर्यंत रिफ्रेश करा.
- पेज सुरू होताच तुमच्या सीट निवडा आणि बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करा.
- सिटची निवड करताच तुम्हाला तिकीट M-तिकीटाच्या माध्यमातून दिलं जाईल. हे तिकीट मॅचच्या दिवशी किंवा काही वेळ आधी ऍक्टिव्हेट होईल.
