TRENDING:

7 पुणेकरांची सायकलवारी, 8 दिवसांत गाठली कन्याकुमारी

Last Updated:
पुण्यातील इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या सात सायकलपटूंनी पुणे ते कन्याकुमारी अंतर सायकलवरून पार केले.
advertisement
1/7
7 पुणेकरांची सायकलवारी, 8 दिवसांत गाठली कन्याकुमारी
  <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यातील</a> इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या सात सायकलपटूंनी पुणे ते कन्याकुमारी अंतर सायकलवरून पार केले. केवळ 8 दिवसांत 1600 किलोमीटरचे अंतर पार करत त्यांनी आपली मोहीम पूर्ण केली.
advertisement
2/7
या सायकलपटूंनी आपल्या मोहिमेची सुरुवात इंडो अथेलेटिक सोसायटीच्या पुण्यातील कार्यालयापासून केली. पुण्याहून निघाल्यापासून कागल येथे 265 किलोमीटरचा पहिला टप्पा होता.
advertisement
3/7
कागलपासून बेळगाव मार्गे येल्लापुर पर्यंत 225 किलोमीटरचा दुसरा टप्पा, त्यानंतर गोकर्ण महाबळेश्वर दर्शन घेऊन मुरूडेश्वर येथे 200 किलोमीटरचा तिसरा टप्पा पूर्ण केला.
advertisement
4/7
मुरुडेश्र्वर ते उडपीपर्यंतचा चौथा टप्पा, तेथून कुन्नुर पर्यंतचा 175 किलोमीटरचा पाचवा टप्पा आणि त्यानंतर थालसेरी मार्गे दक्षिण द्वारका म्हणून ओळखले जाणारे गुरुवायूरपर्यंत 180 किलोमीटरचा सहावा टप्पा पार केला.
advertisement
5/7
सातव्या दिवशी समुद्रकिनारा अनुभव घेत आलप्पी येथे 150 किलोमीटर अंतर कापले. त्यानंतर थिरूअनंतपुरम येथे स्वामी पद्मनाभ दर्शन घेऊन कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद स्मारक या ठिकाणी शेवटचा टप्पा पार केला.
advertisement
6/7
यामध्ये सर्वांनी अगोदर पासून नियमित व्यायाम व सायकलिंगचा सराव केला. कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्यावर कशी मात करायची याची तयारी खूपच अगोदर पासून करण्यात आली.
advertisement
7/7
सर्व टीम मेंबरनी पूर्णपणे सहकार्य केल्यामुळे ही मोहीम यशस्वी रित्या पूर्ण करू शकलो, असे मोहिमेचे प्रमुख युवराज पाटील यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
7 पुणेकरांची सायकलवारी, 8 दिवसांत गाठली कन्याकुमारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल