TRENDING:

छंद असवा तर असा! रेडिओ, ग्रामोफान अन् बरंच काही, Photos पाहून तुम्हालाही आठवेल बालपण!

Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: नोकरी लागल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी देण्यासाठी हा संग्रह करण्याचा ठरवलं, असं संजय पवार सांगतात.
advertisement
1/7
छंद असवा तर असा! रेडिओ, ग्रामोफान अन् बरंच काही, Photos पाहून आठवेल बालपण!
प्रत्येकाला एखादी आवड किंवा छंद असतो. त्यासाठी काहीजण वेळ काढतात आणि तो छंद किंवा आवड जोपासतात. छत्रपती संभाजीनगरमधील संजय पवार हे यापैकीच एक आहेत. लहानपणापासूनच त्यांना रेडिओ, ग्रामोफोन अशा उपकरणांचा छंद होता. त्यांनी हाच छंद जोपासला असून त्यांच्याकडे या दुर्मिळ वस्तूंचा खास संग्रह आहे.
advertisement
2/7
पवार यांच्याकडे सध्या 10 ग्रामोफोन, 2 रेडिओ ग्राम आणि 125 रेकॉर्ड प्लेअर आहेत. तर 2000 तबकड्या त्यांनी संकलित केलेल्या आहेत.
advertisement
3/7
सुटकेस सारखे दिसणारे आठ व्हिडिओ प्लेयर देखील त्यांच्या संग्रहात आहेत. तसेच ‎लॅपटॉप सारखे दिसणारे चार रेकॉर्ड प्लेयर आहेत.
advertisement
4/7
काही पॉकेट रेडिओ देखील पवार यांनी संकलित केलेलं आहे. त्यांनी हे सर्व साहित्य मुंबईच्या चोर बाजारातून तसेच संभाजीनगर येथील रविवारच्या बाजारामधून गोळा केलंय.
advertisement
5/7
संजय पवार हे देशभरातून विविध वस्तूंचे संग्राहक आहेत. विंटेज वस्तूंचं कलेक्शन करणारे त्यांच्याकडून ते साहित्य मागत असतात.
advertisement
6/7
‎आता या दुर्मिळ वस्तूंचे पार्ट कुठेही उपलब्ध नाहीत. त्यांना दुरुस्ती करणारे मेकॅनिक देखील आता नाहीयेत. म्हणून संजय पवार स्वतः हे सगळं शिकत आहेत. सर्व वस्तू ते स्वतः दुरुस्त करतात. त्यांना त्यांच्या संग्रहाचं छान संग्रहालय तयार करायचं आहे. पुढच्या पिढीला या सर्व गोष्टी माहिती व्हाव्यात म्हणून ते सर्वांसाठी खुले करणार आहेत.
advertisement
7/7
“लहानपणापासून रेडिओ ग्रामोफोन बघायचो. पण तेव्हा घरची परिस्थिती नव्हती. त्यामुळे घेणं कधी शक्य झाले नाही. कार्यक्रमांमध्येच रेडिओग्राम फोन बघायचा योग यायचा. मात्र नोकरी लागल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी देण्यासाठी मी हा संग्रह करण्याचा ठरवलं. मी लवकरच याचं संग्रहालय बनवून ते सर्वांसाठी खुले करणार आहे,” असेही संजय पवार सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
छंद असवा तर असा! रेडिओ, ग्रामोफान अन् बरंच काही, Photos पाहून तुम्हालाही आठवेल बालपण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल