TRENDING:

Weather Alert: मंगळवारी हवामानात मोठे बदल, 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. विदर्भ वगळता बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. 29 जुलैचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/7
Weather Alert: मंगळवारी हवामानात मोठे बदल, 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याचे चित्र आहे. कोकणातील काही जिल्हे आणि पूर्व विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यामध्ये सूर्यदर्शन झाल्याचं पाहायला मिळालं. तर काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे. 29 जुलै रोजीचा राज्यातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. अधूनमधून हलक्या सरी कोसळतील. मात्र, मुंबईसह ठाणे आणि उपनगरांना पुढील 24 तास सतर्कतेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
advertisement
3/7
29 जुलै रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भाग वगळता पावसाचा जोर कमी राहील. रत्नागिरी आणि रायगडला पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गला कोणताही सतर्कतेचा इशारा नाही. 30 जुलैपासून पुढील काही काळ पावसाची उघडीप राहणार आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्याला देखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस वगळता पावसाची उघडीप असेल. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहील.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही. आता श्रावण सरी बरसत असून पुढील काही काळ हवामानाची हीच स्थिती कायम राहील.
advertisement
6/7
मराठवाड्यातूनही पाऊस गायब झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. परंतु, या जिल्ह्यांना पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा नाही.
advertisement
7/7
विदर्भातील काही भागात मात्र पावसाचा जोर कायम असणार आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला. या जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: मंगळवारी हवामानात मोठे बदल, 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल