TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रावर मोठं हिम संकट, 'त्सुनामी'ची पहिली झलक, 10 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
16 नोव्हेंबर रोजी राज्यातील 10 जिल्ह्यांना शीत लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रावर मोठं हिम संकट, 'त्सुनामी'ची पहिली झलक, 10 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यातील तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यांतील जेहुर येथे 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. तर महाबळेश्वर, नाशिक, गोंदिया येथे पारा 11 अंश खाली आला असल्याने गारठा वाढतोय. 16 नोव्हेंबर रोजी राज्यातील 10 जिल्ह्यांना शीत लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पाहुयात, 16 नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर ठिकाणी तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
राज्यातील सर्वच भागांत थंडीचा कडाका वाढत असला तरीही कोकण विभागात अजूनही तापमानात फारशी घट झालेली नाही. मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मुंबई आणि उपनगरात निरभ्र आकाश बघायला मिळणार आहे. तसेच इतरही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे येथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. त्यात पुणे घाटमाथा परिसरही समाविष्ट आहे. इतर शहरांत देखील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत 16 नोव्हेंबरसाठी शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर या जिल्ह्यांत 16 नोव्हेंबरसाठी शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच पुढील 2 दिवस शीत लहरींचा इशारा देखील कायम असू शकतो.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत तापमानात घट दिसून येत आहे. गोंदिया येथील तापमान 11 अंशाच्या खाली आले असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
7/7
16 नोव्हेंबर रोजीही राज्यात हुडहुडी कायम आहे. पुढील काही दिवसांत तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढणार आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रावर मोठं हिम संकट, 'त्सुनामी'ची पहिली झलक, 10 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल