Weather Alert: महाराष्ट्रावर पुढील 3 दिवस अस्मानी संकट, हवामान विभागाकडून अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/7

राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/7
4 सप्टेंबर रोजी राज्यातील तब्बल 9 जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पाहुयात 4 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
मुंबईसह कोकणामध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहील, तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीला ऑरेंज तर सिंधुदुर्गला यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलाय.
advertisement
4/7
पुण्याच्या घाट भागाला ऑरेंज तर पुण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. साताऱ्याच्या घाट भागाला यलो अलर्ट तर कोल्हापूरच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
5/7
नाशिक आणि नाशिकचा घाट परिसर, धुळे, नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.
advertisement
6/7
मराठवाड्यात संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने 4 सप्टेंबर रोजीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
7/7
एकंदरीत चार, पाच आणि सहा सप्टेंबर रोजी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहणार आहे, तर विदर्भ मराठवाड्यातून पावसाची सक्रियता कमी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रावर पुढील 3 दिवस अस्मानी संकट, हवामान विभागाकडून अलर्ट