TRENDING:

'जेव्हा जेव्हा ते स्क्रीनवर दिसायचे...', IKKIS पाहून रितेश देशमुख भावूक; धर्मेंद्र यांच्या आठवणीने भरून आले डोळे

Last Updated:
Dharmendra Last Film Ikkis: दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. रितेशने त्यांच्याबद्दल अत्यंत हळवं विधान केलंय.
advertisement
1/6
IKKIS पाहून रितेश देशमुख भावूक; धर्मेंद्र यांच्या आठवणीने भरून आले डोळे
मुंबई: बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता रितेश देशमुख जेव्हा एखाद्या चित्रपटाचं मनापासून कौतुक करतो, तेव्हा त्या सिनेमात नक्कीच काहीतरी खास असतं. नुकताच 'इक्कीस' या बहुचर्चित चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा मुंबईत पार पडला.
advertisement
2/6
या सोहळ्याला सलमान खानपासून सनी देओलपर्यंत साऱ्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. पण, रितेश देशमुख आणि जिनिलीयाने हा सिनेमा पाहिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
3/6
दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या शैलीचे चाहते जगभर आहेत, पण 'इक्कीस' पाहिल्यानंतर रितेशने त्यांना सलाम ठोकला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रितेश म्हणतो, "मी 'इक्कीस' पाहिला आणि अक्षरशः निशब्द झालो. हा केवळ एक युद्धपट नाही, तर हा एक असा अनुभव आहे जो तुम्हाला थेट रणांगणाच्या वास्तवात नेऊन सोडतो. श्रीराम राघवन यांनी हा सिनेमा अत्यंत ताकदीने उभा केला आहे."
advertisement
4/6
या चित्रपटाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र. हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. रितेशने त्यांच्याबद्दल अत्यंत हळवं विधान केलंय. तो म्हणतो, "मोठ्या पडद्यावर धरमजींना पाहणं माझ्यासाठी खूप भावनिक होतं. ते जेव्हा जेव्हा स्क्रीनवर दिसायचे, तेव्हा मी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या. प्रत्येक क्षण जिद्दीने जगणं काय असतं, हे त्यांनी शिकवलं. धरमजी, तुमची आणि तुमच्या त्या अफाट प्रतिभेची आम्हाला कायम आठवण येईल."
advertisement
5/6
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रितेशच्या मते, या दोघांनीही बाजी मारली आहे. "प्रिय अगस्त्य, तू कमाल केलीस! परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांची भूमिका पडद्यावर जिवंत करणं सोपं नव्हतं, पण तू ते सहज केलं. तू मोठ्या पडद्यासाठीच बनला आहेस, मला तुझा अभिमान आहे!" अशा शब्दांत रितेशने त्याचं कौतुक केलं. इतकंच नाही, तर अवघ्या १८ व्या वर्षी सिमरने दाखवलेला आत्मविश्वास पाहून रितेश थक्क झाला आहे. तिचा सहज वावर प्रत्येक सीन उजळून टाकतो, असं त्याने नमूद केलं.
advertisement
6/6
नेहमीप्रमाणे जयदीप अहलावतच्या अभिनयाने रितेशला भुरळ घातली आहे. जयदीप यांच्या डोळ्यांतील वेदना अतुलनीय असल्याचं त्याने म्हटलंय. तसेच, अशा धाडसी कथा प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल त्याने निर्माते दिनेश विजन यांचंही मनापासून अभिनंदन केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'जेव्हा जेव्हा ते स्क्रीनवर दिसायचे...', IKKIS पाहून रितेश देशमुख भावूक; धर्मेंद्र यांच्या आठवणीने भरून आले डोळे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल