Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 2 दिवस धोक्याचे, बर्फापेक्षाही कोल्ड त्सुनामी धडकणार, 14 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्रकडे झेपावत असल्याने राज्यात थंडीची तीव्र लाट असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. 11 डिसेंबर रोजीही राज्यातील 14 जिल्ह्यांत थंडीच्या लाटेची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7

सध्या राज्यात तीव्र थंडीची लाट असल्याचं बघायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 2 दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. 10 डिसेंबर रोजी धुळे आणि जेऊर येथे 6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय. उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्राकडे झेपावत असल्याने राज्यात थंडीची तीव्र लाट असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. 11 डिसेंबर रोजीही राज्यातील 14 जिल्ह्यांत थंडीच्या लाटेची शक्यता असल्यानं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात, 11 डिसेंबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबईतील तापमानात देखील आता घट होताना दिसून येत आहे. मुंबईत 11 डिसेंबर रोजी निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच कोकण विभागातही काहीशी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढलाय. त्यामुळे दोन जिल्ह्यांत शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 7 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पुण्यासह घाटमाथा परिसरात शीत लहरींचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सोलापूरमध्ये सुद्धा शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यात तीव्र थंडीची लाट सध्या बघायला मिळत आहे. प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 8 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतही तापमानात घट झाली आहे. काही ठिकाणी 6 अंश सेल्सिअस तापमानाची देखील नोंद झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत शीत लहरींचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातही चांगलाच गारठा वाढलाय. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद उत्तर महाराष्ट्रात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक येथील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 7 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही तापमानात घट बघायला मिळत आहे. या सर्व जिल्ह्यांत शीत लहरींचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातही गारठा कायम आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यांत शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूर येथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच इतरही जिल्ह्यांत पारा घसरलाय. अमरावती जिल्ह्यांतील चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणी पारा 3 अंश पर्यंत खाली आला होता.
advertisement
7/7
सध्या राज्यात तीव्र थंडीची लाट आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात थंडीचा जोर जास्त असल्याने प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 2 दिवस धोक्याचे, बर्फापेक्षाही कोल्ड त्सुनामी धडकणार, 14 जिल्ह्यांना अलर्ट