TRENDING:

Weather Alert : तुफान आलंया! शुक्रवारी राज्याला पाऊस झोडपणार, 29 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. पाहुयात 24 ऑक्टोबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7
तुफान आलंया! शुक्रवारी राज्याला पाऊस झोडपणार, 29 जिल्ह्यांना अलर्ट
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यामध्ये पाऊस सक्रिय झाला आहे. 24 ऑक्टोबर रोजी राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. पाहुयात 24 ऑक्टोबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह संध्याकाळी किंवा रात्री मध्यम पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातही पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. 24 ऑक्टोबर रोजी पुणे आणि सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव वगळता नाशिक, नंदुरबार, धुळे आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने 24 ऑक्टोबर रोजीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर 25 ऑक्टोबर रोजी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांना 24 ऑक्टोबर रोजीसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे, तर 25 ऑक्टोबर रोजीसाठी परभणी, हिंगोली आणि नांदेड वगळता उर्वरित पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने 24 ऑक्टोबर रोजीसाठी यलो अलर्ट जारी केला. तर 25 ऑक्टोबर रोजी देखील विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता.
advertisement
7/7
दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यावर पाऊस सक्रिय झाला असून 27 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : तुफान आलंया! शुक्रवारी राज्याला पाऊस झोडपणार, 29 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल