TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, बुधवारी वादळी पाऊस कोसळणार, 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
7 नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. तर 5 नोव्हेंबरसाठी पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रावर अस्मानी संकट, बुधवारी वादळी पाऊस कोसळणार, 5 जिल्ह्यांना अलर्ट
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. तर 5 नोव्हेंबरसाठी पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर शहर आणि उपनगरातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला 5 तारखेसाठी यलो अलर्ट तर सहा तारखेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागाने 5 नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे वगळता चारही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्येही तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित परभणी, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भामध्ये मात्र पावसाने काढता पाय घेतला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी कोणताही इशारा दिलेला नसून सामान्यतः कोरडे हवामान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, नोव्हेंबर उजाडला तरी देखील राज्यामध्ये पाऊस सुरू आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर मात्र राज्यामध्ये थंडीचा जोर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, बुधवारी वादळी पाऊस कोसळणार, 5 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल