TRENDING:

Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे! महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार, 26 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. पाहुयात 18 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7
पुढील 24 तास धोक्याचे! महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार, 26 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. पाहुयात 18 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. ठाणे आणि पालघरमध्येही मुंबईसारखीच परिस्थिती राहू शकते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये विजा आणि कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि नाशिकचा घाटमाथा, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये मध्यम पाऊस होऊ शकतो.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो.
advertisement
6/7
विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
7/7
राज्यामध्ये आणखीन दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे आहेत. 18 सप्टेंबर रोजी राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. तर 19 आणि 20 सप्टेंबर रोजी देखील पाऊस राज्यावर सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे! महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार, 26 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल