TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, आता लाट येणार, बुधवारी या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
12 नोव्हेंबर रोजी राज्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहून तापमानात घट झालेली बघायला मिळणार आहे. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री आणि सकाळी वातावरणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे. 
advertisement
1/7
महाराष्ट्रात वारं फिरलं, आता लाट येणार, बुधवारी या जिल्ह्यांना अलर्ट
राज्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत कमी तापमानाची नोंद झाली होती. आताही तेथील तापमानात सातत्याने घट होत आहे. 12 नोव्हेंबर रोजी राज्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहून तापमानात घट झालेली बघायला मिळणार आहे. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री आणि सकाळी वातावरणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे. पाहुयात, 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर ठिकाणी तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबई आणि उपनगरात निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत देखील कोरडे वातावरण राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात देखील कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात देखील दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 नोव्हेंबर रोजी निरभ्र आकाश बघायला मिळणार आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहून तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये निरभ्र आकाश बघायला मिळण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर येथे कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
6/7
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
राज्यातील विविध भागांत दिवसेंदिवस तापमानात घट होत आहे. त्यामुळे थंडीचा जोर वाढताना दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, आता लाट येणार, बुधवारी या जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल