Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, विजांचा कडकडाट होणार, पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
2 नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
advertisement
1/7

राज्यभरात नोव्हेंबरच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 2 नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पाहुयात 2 नोव्हेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तसेच घाटमाथा परिसरातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुण्यात कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगरात कमाल तापमान 30 अंश आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 28 अंश आणि किमान 21 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. या सर्व जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही. नागपुरात कमाल तापमान 30 अंश आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
7/7
राज्यात सध्या वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे 2 नोव्हेंबर रोजी राज्याच्या बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून तापमानात थोडी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, विजांचा कडकडाट होणार, पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट