Weather Alert : महाराष्ट्रात येणार हिम लाट, हवामान खात्याकडून अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसपेक्षाही खाली आला आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा थंडी अनुभवायला मिळत आहे.
advertisement
1/7

राज्यात ढगाळ वातावरणाचा प्रभाव संपताच गारठा वाढला आहे. मुंबई वगळता राज्यातील तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसपेक्षाही खाली आला आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा थंडी अनुभवायला मिळत आहे. पाहुयात 30 नोव्हेंबर रोजी हवामान कसं असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी धुके पहायला मिळेल. तर त्यानंतर आकाश स्वच्छ होईल. तर मुंबईतील कमाल तापमान 32 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील. कोकणातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील याच प्रकारचे हवामान पहायला मिळेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. 30 नोव्हेंबर रोजी पुण्यात किमान तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये सकाळी ढगाळ असलेले आकाश दुपारनंतर निरभ्र होईल. किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात सकाळी दाट धुके पहायला मिळेल. यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. तर नंतर आकाश निरभ्र राहील. किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहील. जळगावमध्ये 14 अंश सेल्सिअस एव्हढं किमान तापमान असेल.
advertisement
5/7
मराठवाड्यात देखील गारठा वाढला आहे. आगामी काळात थंडी आणखी वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील. तर नांदेडमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील.
advertisement
6/7
विदर्भात अंशतः ढगाळ आकाशासह धुके पहायला मिळेल. त्याबरोबर गारठा देखील वाढणार आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 28 तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांतील वातावरण देखील याच प्रकारे असेल.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.