TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्र आणखी गारठणार, गुरूवारी हाडं गोठवणारी थंडी पडणार, हवामान खात्याचा अलर्ट

Last Updated:
राज्यातील किमान तापमानात घसरण झाली आहे. यामुळे बहुतेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे. पाहुयात 13 नोव्हेंबरला राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
1/7
महाराष्ट्र आणखी गारठणार,गुरूवारी हाडं गोठवणारी थंडी पडणार,हवामान खात्याचा अलर्ट
राज्यातून पाऊस परतल्याने कोरडं हवामान पाहायला मिळत आहे. तर राज्यातील किमान तापमानात घसरण झाली आहे. यामुळे बहुतेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे. पाहुयात 13 नोव्हेंबरला राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
2/7
मुंबईतील किमान तापमानात घट पाहायला मिळत आहे. यामुळे गारवा जाणवण्यास सुरुवात झालीय. 13 नोव्हेंबर रोजी मुंबईत निरभ्र आकाश राहील. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात देखील गारठा वाढला आहे. पुण्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर कोल्हापूरमध्ये किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढं असेल.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात कमालीचा गारवा जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान हे केवळ 9 अंश सेल्सिअस असेल. त्यामुळे इथे हाडं गोठवणारी थंडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाशिकमध्येही किमान तापमान हे केवळ 11 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात देखील मागील चार ते पाच दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. आगामी काळात देखील गारठ्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही. छत्रपती संभाजीनगर शहरात 13 नोव्हेंबर रोजी किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर नांदेडमध्ये 14 अंश सेल्सिअस इतके असेल.
advertisement
6/7
विदर्भात देखील सकाळी आणि संध्याकाळी गारवा कायम राहील. नागपूरमधील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर अमरावतीमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
advertisement
7/7
एकंदरीत राज्यात सगळीकडेच गारठा वाढला आहे. आगामी दिवसांत गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी गरम कपडे परिधान करण्याचा तसेच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्र आणखी गारठणार, गुरूवारी हाडं गोठवणारी थंडी पडणार, हवामान खात्याचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल